पुणे : फर्ग्युसन महाविद्लयाला विद्यापीठाचा दर्जा मिळाल्याचे कुठलेही अधिकृत पत्र अद्याप मिळाले नसल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. रविंद्रसिंह परदेशी यांनी लाेकमतशी बाेलताना दिली. स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा मिळावा म्हणून महाविद्यालयाने 19 एप्रिल राेजी अर्ज केला हाेता, परंतु अद्याप विद्यापीठाचा दर्जा मिळाल्याची काेणतीही अधिकृत माहिती अाम्हाला मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण क्षेत्रातील नावाजलेले महाविद्यालय म्हणून डेक्कन एज्युकेशन साेसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाची अाेळख अाहे. डेक्कन एज्युकेशन साेसायटीची स्थापना विष्युशास्त्री चिपळुणकर, लाेकमान्य टिळक, गाेपाळ गणेश अागरकर, महादेव नामजाेशी यांनी या केली हाेती. या अाधीच फर्ग्युसन महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा मिळाला अाहे. त्यानंतर महाविद्यालया तर्फे विद्यापीठाचा दर्जा मिळण्यासाठी अर्ज करण्यात अाला हाेता. फर्ग्युसन महाविद्यालयाबराेबरच बंगळूरच्या शासकीय विज्ञान महाविद्यालय व सेंट जाेसेफ महाविद्यालय यांनाही विद्यापीठाचा दर्जा मिळण्याची शक्यता अाहे. मुंबईच्या सेंट झेवियरस अाणि मिठीबाई महाविद्यालय यांनी सुद्धा विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी अर्ज केला हाेता.
या महाविद्यालयांना विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यास केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत 55 काेटी रुपयांची अनुदान मिळणार अाहे. विद्यापीठाच्या दर्जा विषयी बाेलताना फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. रविंद्रसिंह परदेशी म्हणाले, अाम्ही 19 एप्रिल राेजी महाविद्यालयाला विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी अर्ज केला हाेता. अाम्हाला अद्याप दर्जा मिळाल्याचे कुठलेही अधिकृत पत्र मिळालेले नाही. काही माध्यमांमधून अाम्हाला विद्यापीठाचा दर्जा मिळाल्याची माहिती मिळाली. परंतु याबाबतची अधिकृत घाेषणा अद्याप करण्यात अालेली नाही.