पुणे: राज्य शासनातर्फे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविली जात असून त्यात जिल्ह्यातील ५९ शेतक-यांचे दावे कंपनीकडे कार्यवाहीसाठी प्रलंबित आहेत. तर १५ दाव्यांवर अपूर्ण कागदपत्रांच्या अभावी कार्यवाही होत नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, येत्या महिना अखेरीस संबंधित दाव्यांची रक्कम मिळण्याची शक्यता आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रस्त्यावरील अपघात,रेल्वे अपघात,पाण्यात बुडून मृत्यू,जंतूनाशक किंवा अन्य कारणांमुळे विषबाधा,विजेधा धक्का,वीज पडून मृत्यू, खून, उंचीवरून पडून झालेला अपघात किंवा सर्पदंश किंवा इतर जनावरांच्या चाव्यामुळे झालेला मृत्यू तसेच दंगल वा कोणत्याही कारणामुळे शेतक-याचा अपघात झाल्यास १० ते ७५ वयोगटातील शेतक-याला २ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ११४ शेतक-यांचे दावे शासनाने नियुक्त केलेल्या कंपनीकडे दाखल करण्यात आले आहेत. त्यात जुन्नर मधील २६,बारामती व इंदापूरातील प्रत्येकी १८ ,शिरूर व दौंड मधील प्रत्येकी १३ आणि मावळ तालुक्यातील १५ दाव्यांचा समावेश आहे.तर इतर तालुक्यातील शेतक-यांचे दावे ही कंपनीकडे दाखल करण्यात आले आहेत.अपघातामुळे डोळे अथवा अवयव निकामी झाल्यास विमा योजनेचा लाभा दिला जातो. त्यासाठी आवश्यक कागदपत्र सादर करावे लागतात.मात्र,१५ शेतक-यांनी अपूर्ण कागदपत्र सादर केल्यामुळे त्यांच्या दाव्यांवरील कार्यवाही थांबली आहे.परंतु,जिल्ह्यातील १४४ पैकी ६५ दावे मंजूर करण्यात आले आहेत.
शेतकरी अपघात विम्याचे दावे प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 6:44 PM
राज्य शासनातर्फे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविली जात असून त्यात जिल्ह्यातील ५९ शेतक-यांचे दावे कंपनीकडे कार्यवाहीसाठी प्रलंबित आहेत.
ठळक मुद्देजिल्ह्यातील १४४ पैकी ६५ दावे मंजूर १० ते ७५ वयोगटातील शेतक-याला २ लाख रुपयांचे विमा संरक्षण