माळेगाव : ऊस उत्पादक शेतकरी आणि आंदोलन हे सूत्र आता नित्याचेच होऊन बसले आहे. याही वर्षी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. फरक केवळ एवढाच आहे, की त्यावेळचे सत्ताधारी आजचे विरोधक आहेत तर विरोधक सत्ताधारी. या आंदोलनासाठी अजित पवारांनी विविध ठिकाणी दौरे करून प्रयत्न केले आहेत.बारामती येथे राष्ट्रवादी भवनात नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये माळेगाव कारखाना बचाव समितीची स्थापना करण्यात आली. या वेळी कारखाना प्रशासनाच्या चुकीच्या व बेजबाबदार कारभाराचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार असल्याचे निदर्शनास आणून देत त्याविरोधात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासन नियमांप्रमाणे एफआरपीची किंमत एकरकमी मिळावी, उशिरा कारखाना चालू झाल्याने सभासदांचे होणारे नुकसान, रखडलेला कांडे बिलाचा प्रश्न, सभासदांना एकरी दिलेले ३,००० रुपयांचे अॅडव्हान्स बिलाचे रूपांतर अनुदानात करण्याच्या मागणीसह काही ऊस उत्पादक व ऊस वाहतूकदार यांना मिळत असलेल्या पक्षपाती भूमिकेचा निषेध करण्यात येणार आहे. (वार्ताहर)
माळेगावचे शेतकरी आक्रमक
By admin | Published: November 14, 2015 2:58 AM