प्रशांत ननवरे - बारामती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्याला कृषिक्षेत्र देखील अपवाद नाही.शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. बंदमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. कोरोनाच्या भीतीने बाजारात ग्राहक फिरकत नसल्याचे चित्र आहे.मात्र, बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी या अडचणीमुळे हताश न होता, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन शेतीच्या बांधावर शेतमालाची विक्री सुरु केली आहे. त्यामुळे शेतकरी ते ग्राहक संकल्पना मजबूत होणार आहे.शेतकऱ्यांना रास्त दर,तर ग्राहकांना चांगल्या दरात शेतीमाल मिळणार आहे.कोरोना लॉकडाऊनमुळे बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील तसेच बागेतील फळे, भाजीपाल्याला मागणी अभावी कवडीमोल भावात व्यापारी वगार्ने मागणी केल्याचे चित्र आहे.अनेकांनी या शेतीमालाकडे पाठ फिरविली आहे. मात्र, सेंद्रीय शेतीद्वारे निर्यातक्षम उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी हार मानलेली नाहि . बारामती तालुक्यातील प्रल्हाद वरे या शेतकऱ्यांने हि शक्कल लढ विली आहे.त्यांनी शेतातील बांधावर माल शेतातच विकण्यास सुरुवात केली.त्यासाठी वरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह सोशल मीडियावर त्यांच्या उत्पादनांची माहिती शेअर केली.त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मालास ग्राहक शेताच्या बांधावर येत खरेदी करत आहेत.वरे यांनी त्यांच्या शेतात सहा एकरात कलिंगडाच्या विविध जातींच्या वाणाची पेरणी केली होती.बारामती परिसरात मळद, बारामती मधील शेतामध्ये कलरफुल टरबूज (कलिंगड) व खरबूज चे प्लॉट केले आहेत.यामध्ये वरून पिवळा व आतून लाल असलेले विशाला, वरून हिरवा आणि आतून लाल असलेले , वरून हिरवा आणि आतून पिवळ असलेले , वजनदार व एक्सपोर्ट होणाºया खरबूज व कलिंगड मालाला चांगली मागणी असल्याचे वरे यांनी सांगितले. तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील कलिंगड, टरबूज विक्रीसाठी ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच कोरोना मुळे वाहतूक बंद, मार्केट बंद आहे. ग्राहक कोरोनाच्या भीतीमुळे मालाच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. वरे यांनी व्हॉट्सअप, फेसबुक तसेच मोबाईलद्वारे ग्राहकांना त्यांच्या तयार मालाची माहिती दिली. ग्राहकदेखील त्यास चांगला प्रतिसाद देत आहेत. त्या निमित्ताने शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरली.ग्राहकांना योग्य दरात शेतातील ताजा माल मिळाला.तर शेतकऱ्यांना देखील रास्त दर मिळाला.वरे यांनी सध्या त्यांच्या मळद येथीज शेतालगतच कलिंगड,खरबुजाची विक्री सुरु केली आहे. ग्राहकांची मागणीही वाढत असल्याने इतर शेतकऱ्यांनी देखील सोशल मीडिया पॅटर्न राबविण्यास सुरवात केली आहे. कोरोनाचे संकट मोठे आहे.यातुन अनेकांवर परिणाम झाला आहे.मात्र, बारामतीच्या शेतकऱ्यांनी हे संकट संधी मानुन शेतकरी ते ग्राहक संकल्पना यशस्वी करण्यास सुरवात केली आहे.भविष्यात ही साखळी मजबुत होण्यास मदत होणार आहे त्यातुन ग्राहक आणि शेतकरी या दोघांचे हित साधले जाणार आहे,असे प्रल्हाद वरे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.
बारामतीत कोरोनामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी लढविली शक्कल!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 1:08 PM
सोशल मीडियाद्वारे शेतीच्या बांधावर कलिंगड,खरबुजाची केली विक्री
ठळक मुद्देशेतकरी ते ग्राहक संकल्पना होणार मजबूतशेतकऱ्यांना रास्त दर,तर ग्राहकांना चांगल्या दरात शेतीमाल मिळणार शेतालगतच कलिंगड,खरबुजाची विक्री केली सुरु