शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

विजेचा धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू; सुपे नजीकच्या खोपवाडी येथील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2023 11:53 PM

सुपे: पावसाने उघडीप दिल्याने ज्वारीची पेरणी करुन सारे काढीत असताना वीज खांबाच्या तान दिलेल्या तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा जागीच ...

सुपे: पावसाने उघडीप दिल्याने ज्वारीची पेरणी करुन सारे काढीत असताना वीज खांबाच्या तान दिलेल्या तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना बुधवारी ( दि०४ ) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बारामती तालुक्यातील सुपे नजीक असणाऱ्या उत्तर खोपवाडीत घडली. 

शहाजी रामचंद्र चांदगुडे ( रा. उत्तर खोपवाडी, दंडवाडी ) असे या मृत्यु झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.  येथील ग्रामस्थांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, खांब उभा केल्यावर खांबाला ताण दिला जातो, त्या ठिकाणी चिनीमातीचा कप असतो. मात्र या ठिकाणी हा कप नसल्याने थेट वीज प्रवाह या ताणतारेत उतरला होता. तर पेरणी केल्यावर सारे काढीत असताना या तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यु झाला. याला जबाबदार वीज वितरण कंपनी असल्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले होते. या घटनेला वीज वितरण कंपनी जबाबदार आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला मदत मिळाल्या शिवाय येथील मृत्युदेह हलवु देणार नाही, अशी भुमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. येथील घटना घडुन चार तास उलटुनही वीज वितरणचे अधिकारी येत नसल्याने शेतकरी संतप्त झाले होते. 

दरम्यान सुपे पोलिस स्टेशनचे सपोनी नागनाथ पाटील व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी भेट देवुन माहीती घेतली. तर उशीरा येथील वीज वितरणचे शाखा अभियंता चव्हाण आले. त्यांनी याबाबत पहाणी करुन शेतकऱ्याच्या कुटुंबाला सर्वोतोपरी मदत मिळवुन देवु असे सांगितले. त्यानंतर पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यात आले. चांदगुडे यांच्या मागे पत्नी दोन लहान मुले आणि आजारी आई, वडील असतात. येथील घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  

टॅग्स :Farmerशेतकरी