राष्ट्रीय सुरक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत रब्बी हंगाम २०२०-२१ करिता हरभरा पीक प्रकल्प तसेच शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी वडगाव बांडे येथे शेतीदिन कार्यक्रम व शेतकरी प्रक्षेत्र भेट, शेतीशाळा उपक्रम राबवण्यात आला असल्याची माहिती कृषि पर्यवेक्षक कैलास चव्हाण, कृषि सहायक संतोष लोणकर यांनी दिली.
यावेळी प्रगतशील शेतकरी राजेंद्र मेमाणे यांचे हरभरा प्रात्यक्षिक प्लॉटवर सर्व शेतकऱ्यांची प्रक्षेत्र भेट,शेतकरी व शास्त्रज्ञ यांचा सुसंवाद आयोजित करण्यात आला.
या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील माजी कुलगुरु डॉ. नेरकर, माजी संशोधन संचालक डॉ. सुभाष शिंदे, पाडेगाव संशोधन केंद्र विशेषज्ञ डॉ.सुरेश पवार,मच्छिंद्र बोखारे, राजेश थोरात, माजी तालुका कृषि अधिकारी तानाजी मेमाणे, भीमाजी मेमाणे, रंगनाथ बांडे, बाळकृष्ण गायकवाड, जयवंत गरदरे, अंकुश भरणे,दिवाणजी पारखी,माणिक खुंटे,आप्पा पिंगळे, माणिक जाधव, शिवाजी गरदरे आदी मान्यवर उपस्थित होते.
वडगाव बांडे येथे राष्ट्रीय सुरक्षा अभियानांतर्गत शेतीदिन कार्यक्रम व शेतकरी प्रक्षेत्र भेट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.