इंदापूर : शेतीतज्ज्ञांची भाकिते, कृषीविषयक पुस्तकातील सर्व ठोकताळे मोडून काढत, राज्यात पहिल्यांदाच घेतलेल्या शतावरीच्या पिकाने इंदापुरातील माळवाडी नं.२ च्या धनाजी सुर्वे या शेतकऱ्याला लखपती होण्याचा मार्ग दाखवला आहे. सामान्यत: शतावरीच्या एका झाडाच्या मुळाचे सरासरी वजन अडीच ते तीन किलो असते, असे कृषितज्ज्ञांचे भाकीत असते. सुर्वे यांनी लावलेल्या शतावरीच्या एका झाडाच्या मुळाचे वजन तब्बल १४ ते १६ किलो आहे. त्यांनी १ हजार २५० झाडे लावली. त्यातून सरासरी १४ टन ओल्या मुळांचे उत्पादन होईल. खर्च वजा जाता सुर्वे यांना ७ लाख नफा अपेक्षित आहे. याशिवाय त्यांनी शतावरीमध्ये तिहेरी आंतरपीक घेऊन २ लाख ५० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. सुर्वे यांच्या रानातील शतावरीच्या काढणीस शनिवारी (दि. १७) मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. आयुष मिशनच्या माध्यमातून राज्यात सन २०१३ पासून सुगंधी व औषधी वनस्पती लागवड अभियान राबवले जाते.आंतरपीक भरघोससुर्वे यांनी शतावरीमध्ये मिरचीचे आंतरपीक घेऊन २ लाख ८४ हजार रुपये मिळवले. कलिंगडाचे आंतरपीक घेऊन ९६ हजार रुपये मिळवले, तर कांद्याचे पीक घेऊन ७२ हजार रुपये मिळवले. जवळपास ४ लाख ५० हजार रुपयाची आंतरपिके त्यांनी सेंद्रिय पद्धतीने घेतली. खर्च वजा जाता त्यांना २ लाख ५० हजार रुपयांचा फायदा या तिहेरी आंतरपिकातून झाला.
शतावरीच्या पिकाने इंदापुरातील शेतकरी लखपती; एका झाडाच्या मुळाचे वजन तब्बल १४ ते १६ किलो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 1:33 PM
शेतीतज्ज्ञांची भाकिते, कृषीविषयक पुस्तकातील सर्व ठोकताळे मोडून काढत, राज्यात पहिल्यांदाच घेतलेल्या शतावरीच्या पिकाने इंदापुरातील माळवाडी नं.२ च्या धनाजी सुर्वे या शेतकºयाला लखपती होण्याचा मार्ग दाखवला आहे.
ठळक मुद्देधनाजी सुर्वे यांनी लावली १ हजार २५० झाडे, सरासरी १४ टन ओल्या मुळांचे उत्पादनआयुष मिशनच्या माध्यमातून राज्यात २०१३ पासून सुगंधी व औषधी वनस्पती लागवड अभियान