यवत : पंतप्रधान पीकविमा योजनेचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी रात्री १२ पर्यंत मुदत असल्याने शेतकºयांनी बँकांमध्ये गर्दी केली होती. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याने रात्री दोनपर्यंत बँकांपुढे शेतकºयांच्या रांगा होत्या. यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.शुक्रवारी (दि. ४) यवत येथील आपले सरकार सेवा केंद्रात परिसरातील अनेक गावांमधील शेतकरी रात्री उशिरापर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी थांबून होते. सकाळपासून शेतकरी बांधव आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी थांबलेले असताना शासकीय संकेतस्थळावर अर्ज दाखल होण्यास विलंब लागत होता. मात्र, ५ आॅगस्ट रोजी अखेरची मुदत असल्याने कितीही वेळ लागला तरी चालेल म्हणून शेतकºयांनी संबंधित केंद्रचालकांना विनंती करून थांबण्यास सांगितले. मात्र, अर्जांची संख्या जास्त असल्याने १२ वाजून गेले, तरी शेतकºयांचे अर्ज भरणे बाकीच होते. रात्री बारा वाजता आॅनलाईन अर्ज भरण्याची साईट बंद झाल्याने शेतकरी हवालदिल झाले. दिवसभर थांबूनदेखील अर्ज दाखल न झाल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली. रात्री दोन वाजता शेतकºयांनी लोकमत प्रतिनिधीशी संपर्क साधून सेवा केंद्रात बोलावून घेतले व त्यांची व्यथा मांडली. काही महिला शेतकरी रात्री उशिरापर्यंत थांबूनदेखील तेथे अर्ज भरून न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. शनिवारी सकाळी कृषी विभागाच्या अधिकारीवर्गाशी संपर्क झाल्यांनंतर त्यांनी शासनाच्या वतीने एक दिवसाची जादा मुदत अर्ज दाखल करण्यासाठी मिळाल्याचे सांगितले. आॅनलाईन अर्ज दाखल करण्यास अडचण निर्माण होत असल्याने आॅफलाईन अर्ज दाखल करून घेतले. यामुळे आज दिवसभर परत एकदा अर्ज दाखल करणारे शेतकरी सेवा केंद्रांवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.ज्येष्ठ नागरिकांची झाली गैरसोययापूर्वी भारनियमनामुळे शेतात रात्रीच्या वेळी पिकाला पाणी देणारे शेतकरी आपण पाहिले होते; मात्र रात्री दोन वाजेपर्यंत आपले सरकार सेवा केंद्राबाहेर रांगा लावून थांबलेले शेतकरी पाहण्याचा प्रसंग काल आला तो पीकविम्याचे अर्ज दाखल करण्यासाठी शेतकरी आलेले असताना.यवत येथील सेवा केंद्राबाहेर चक्क रात्री दोन वाजेपर्यंत शेतकरीवर्ग त्यात ज्येष्ठ नागरिक व विशेष म्हणजे शेतकरी महिलादेखील थांबून होत्या. पीकविम्याचा अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख असल्याने शेतकरी थांबलेले असूनदेखील आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची साईट मुदतीच्या अगोदरच्या रात्री बारा वाजता बंद पडल्याने शेतकºयांची मोठी अडचण झाली.
रात्री दोनपर्यंत शेतकरी रांगेतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 4:36 AM