जुन्नर : जुन्नरजवळील निमदरी येथील कैलास तुकाराम घुले (वय ५०) या शेतकºयाने कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीलगत असणाºया बाभळीच्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली.घुले यांनी नित्यनियमाप्रमाणे रात्री दहाच्या सुमारास जेवण केले. त्यानंतर ही घटना घडली. कैलास घोगरे या शेतकºयावर बँकेचे शेतीसाठी घेतलेले कर्ज, तसेच मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेले जवळपास पाच लाखांपेक्षा जास्त कर्ज होते. कर्जासाठी वारंवार होणाºया तगाद्यामुळे कैलास घुले गेल्या काही दिवसांपासून तणावात होते, असे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले. त्यांनी कर्जबाजारीपणालाच कंटाळून आत्महत्या केल्याचा दावा नातेवाइकांकडून करण्यात आला आहे. घुले यांच्या मागे वडील, पत्नी, तीन मुली व मुलगा असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या निधनामुळे या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
कर्जबाजारीपणाला कंटाळून निमदरीत शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 2:36 AM