शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

पाण्यासाठी शेतकरी आक्रमक

By admin | Published: September 09, 2016 1:50 AM

यावर्षी पुणे जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस झाला. धरणं ओव्हरफूल झाली मात्र पश्चिम भागात. पूर्व भागातील बारामती, इंदापूर, पुरंदर व दौैंड या तालुक्यात मात्र पावसाने म्हणावी

यावर्षी पुणे जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस झाला. धरणं ओव्हरफूल झाली मात्र पश्चिम भागात. पूर्व भागातील बारामती, इंदापूर, पुरंदर व दौैंड या तालुक्यात मात्र पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नाही. त्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने या परिसरातील शेतीला पाण्याची गरज निर्माण झाली आहे. काही भागात पिकं धोक्यात आल्याने निरा डावा कालवा, पुरंदर उपसा व जनाई शिरसाई या योजनेतून पाण्याची मागणी वाढली आहे. शेतकरी आक्रमक होत असून गुरूवारी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात शेतकऱ्यांना ठिय्या मारला. पाटबंधारे कार्यालयासमोर मारला ठिय्याभवानीनगर : नीरा डावा कालव्याचे पाणी मिळण्यासाठी गुरुवारी (दि. ८) सणसरसह ११ गावांतील शेतकऱ्यांनी गुरुवारी सणसर पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्यांनी ठिय्या दिला. पाटबंधारे बारामती विभागाचे उपअभियंता ए. आर. भोसले यांनी शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली. या वेळी शेतकऱ्यांनी भोसले यांना पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन दिले. १५ सप्टेंबरपर्यंत पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.नीरा डावा कालव्याच्या ३६ क्रमांकाच्या वितरिकेवर चिखली, कुरवली, जांब, मानकरवाडी, उद्धट, तावशी, पवारवाडी, उदमाईवाडी, हिंगणेवाडी, सपकळवाडी, सणसर या ११ गावांमधील शेती अवलंबून आहे. पावसाने पाठ फिरविली आहे. उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने येथील शेतकऱ्यांनी पिके जपली आहेत. नीरा डावा कालव्याच्या पाण्यावरच येथील शेती अवलंबून आहे. मात्र, कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे शेती अडचणीत आली आहे. शेतीपिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत, अशा व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या.या वेळी येथील शेतकरी आणि संजय गांधी निराधार योजनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष तानाजी थोरात म्हणाले, की परिसरातील शेतकऱ्यांनी कठीण परिस्थितीत उन्हाळा पार केला. सध्या या भागांमधील विहिरींची पाणीपातळी घटली आहे. ५ ते १० मिनिटे विद्युतपंप सुरू राहतो. त्यामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध होते. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. कालवा समितीच्या बैठकीत टेल टू हेड पाणी नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार इंदापूर आणि बारामतीला पाणी मिळाले; मात्र केवळ ३६ वितरिकेवरील शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही.या वेळी मारुतराव वणवे, लालासाहेब सपकळ, शिवाजीराव रूपनवर, दिलीप पांढरे, रवींद्र कदम, दिलीप निंबाळकर, एल. पी. भोईटे, अमर कदम, सुभाष चव्हाण, प्रमोद थोरात आदी उपस्थित होते. ( वार्ताहर )जनाई उपसाच्या पाण्याची प्रतीक्षावासुंदे : दौंड तालुक्याच्या जिरायत भागातील नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची अद्यापही टंचाई भासत असून, या भागात वर्षभरापासून सुरू असलेले पाण्याचे टँकर सुरूच आहेत. या भागातील जनता जनाई उपसा सिंचन योजनेच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहे.वासुंदे, हिंगणीगाडा, जिरेगाव, रोटी, कुसेगाव, पडवी, पांढरेवाडी ही गावे पुरेशा पावसाअभावी सतत दुष्काळाच्या छायेत येत आहेत. या भागातील शेतकऱ्यांना शेतीच्या तर सोडाच, परंतु पिण्याच्या पाण्याची कायमच टंचाई जाणवत असल्याने सततच्या दुष्काळाने बळीराजा पुरता हतबल झाला आहे. अनेक गावांना आजही शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच आहे. तर, वासुंदे गावासाठी (दि.४) रोजी सुरू झालेला टँकर वर्षभरापासून बंदच झालेला नसून येथील जनता पाण्यासाठी आजही टँकरवर अवलंबून आहे. सततच्या दुष्काळामुळे जमिनीतील पाणीपातळीत कमालीची घट झाल्याने पाण्याचे सर्व स्रोत ऐन पावसाळ्यातही कोरडे आहेत. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चारा व पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढतच आहे. यासाठी या भागातील तलाव व बंधाऱ्यांमधून जनाई उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडल्यास पाणीटंचाई कमी होऊन जनावरांच्या पाणी व चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने या भागातील जनता जनाईच्या पाण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. ( वार्ताहर )