पाटस (जि. पुणे) : कर्जमाफीसंदर्भात शासनाच्या धोरणाच्या विरोधात कानगाव (ता. दौंड) येथील शेतक-यांनी सोमवारी काळ्या फिती लावून निषेध केला. दोन शेतक-यांनी कर्जमाफी नाकारली असून, येत्या २ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आक्रोश आंदोलन करण्याचा निर्धारही करण्यात आला.आंदोलन यशस्वी करण्यासाठी गावातील ४० लोकांची कृती समिती स्थापना करण्यात आली आहे. जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत कानगाव (ता. दौंड) येथील राज्यव्यापी आंदोलन मागे घेतले जाणार नाही.प्रसंगी बलिदानाची तयारीदेखील आम्ही ठेवली आहे, असा इशारा किसान क्रांती आंदोलनाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी जाहीर सभेत दिला.
कानगावला २ नोव्हेंबरपासून शेतक-यांचे आक्रोश आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 5:29 AM