इंदापूर : येत्या दोन दिवसांत शेतीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर तालुक्यातील महावितरण कंपनीच्या अधिकाºयांना खुर्चीवर बसू दिले जाणार नाही. वीज केंद्रांना कुलपे घातली जातील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी आज (दि. २९) दिला.महावितरण कंपनीने सुरू केलेली शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम बंद करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरात पंचायत समितीसमोर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्या वेळी ते बोलत होते.महारुद्र पाटील, अमोल भिसे, मधुकर भरणे, अनिल राऊत, श्रीधर बाब्रस, किसन जावळे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याआधी या विषयावर त्याच ठिकाणी रास्ता रोको करताना आमदार दत्तात्रय भरणे यांना टीकेचे लक्ष्य केले होते. त्याचा खरपूस समाचार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतला.महारुद्र पाटील म्हणाले, की गेल्या दोन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदाच्या चांगल्या पावसामुळे शेतकरी पीकपेरणीस लागला आहे. त्यांना दिलासा देण्याऐवजी शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निंदनीय प्रकार भाजप सरकारने चालवला आहे. तो बंद करावा; अन्यथा शेतकरी त्यांना दणका दिल्याशिवाय राहणार नाहीत. अमोल भिसे म्हणाले की, युती शासनाच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी दिलेली कोणतीही आश्वासने पाळली गेली नाहीत. उलट नोटाबंदी असो, जीएसटी असो यातून लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला आहे. आता जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या धोरणाने शेतकºयांची क्रूर चेष्टा चालवलेली आहे. जर या शासनाला शेतकºयांसाठी काहीच करता येत नसेल तर त्याने सत्तेवरुन पायउतार व्हावे, असे ते म्हणाले.या वेळी अनिल राऊत, रमेश पाटील, वसंत आरडे यांची भाषणे झाली. महावितरण कंपनीचे इंदापूर विभागाचे सहायक अभियंता रघुनाथ गोफणे, तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. अशोक चोरमले, किसन जावळे, कालिदास देवकर, अरबाज शेख, सचिन चव्हाण, नाना नरुटे, साहेबराव चोपडे, आप्पा पाटील, विजय वाघमोडे व इतर कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
महावितरणविरोधात शेतक-यांचा असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 6:40 AM