शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

आपत्तीग्रस्तांना कृषिकन्यांची मदत; लोकवर्गणीतून ७५ हजारांचे सहाय्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 11:00 PM

केरळ राज्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राहुरी कृषी विद्यापीठाच्या कृषिकन्यांनी भरीव मदत केली आहे

उरुळी कांचन : केरळ राज्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राहुरी कृषी विद्यापीठाच्या कृषिकन्यांनी भरीव मदत केली आहे. आर्थिक मदत म्हणून ७५ हजार रुपयांची रक्कम ग्रामस्थांकडून लोकवर्गणी स्वरूपात गोळा करून पूरग्रस्तांना पाठविली आहे.शिंदवणे (ता. हवेली) गावात कृषी अभ्यास वर्गासाठी या कृषिकन्या तात्पुरत्या स्थायिक झाल्या आहेत. केरळमध्ये महाभयंकर पुराने राज्यभरातील सर्व यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत. परिणामी पूरग्रस्त नागरिकांना जीवन जगणे अडचणीचे झाले आहे.अभ्यास वर्गातील कृषिकन्या अनिया एलिझाबेथ थॉमस ही मूळची केरळ राज्यातील आहे. पुणे कृषी महाविद्यालयात ती शिक्षण घेत आहे. सध्या ग्रामीण कृषी कार्यानुभव या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शिंदवणे गावात कार्यरत आहे. तिच्या प्रेरणेतून सहकारी मैत्रीणी निकिता बागल, सृष्टी धुमाळ, सुप्रिया भिसे, विमल धायगुडे, प्रियश्री भंडारी, अमृता अहिवळे व ग्रामस्थांच्या माध्यमातून वर्गणी गोळा करून ही रक्कम उभी केली आहे. ग्रामस्थांच्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील काही परिचित सामाजिक संस्था व मान्यवरांकडून पेटीएम, तेज व भीम अ‍ॅपच्या माध्यमातून या कृषिकन्यांनी मदत गोळा केली आहे. ही मदत आर्मी व नेव्ही कॅन्टोन्मेट बोर्ड पुणे यांच्या माध्यमातून गरजेच्या वस्तूस्वरूपात पूरग्रस्तांना पाठविणार आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरPuneपुणे