लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजे : पेडगाव (ता.दौंड) येथील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी एकत्रित येऊन स्वत:च्या शेतातील पिके जळण्यापासुन वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. दौंडच्या पुर्वभागासाठी भामाआसखेडचे पाणी सोडणयात आले. मात्र, पाणी अद्याप पेडगाव ठिकाणी पोहचले नाही. त्यामुळे या भागातील उभी पिके जळुन चालली आहे. परंतु, दौंड तालुक्यातील पेडगाव व श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पेडगाव बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असलेले उजनीचे फुगवट्याचे पाणी दहा यांत्रिक बोटी व दीडशे एचपीची विद्युत मोटरीच्या सहाय्याने पाणी बंधाऱ्याच्या वरच्या भागात टाकत आहे. त्यामुळे पिके वाचणार अशी आशा येथील शेतकऱ्यांना वाटते.गेल्या वर्षी सुद्धा या भागाला भामाआसखेडचे पाणी सोडण्यात आले. मात्र ते पाणी ‘टेल टु हेड’ या पद्धतीने न सोडल्याने या भागात पाणी पोहचु शकले नाही. त्यामुळे भागातील ऊस पिके जळुन गेली. याभागातील शेतकरी नेहमी दुहेरी संकटात सापडत आहे. आता शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेली पिके जळण्याच्या मार्गावर आहे . त्यामुळे पाटबंधारे विभागाने पाण्याचे व्यवस्थित नियोजन करणे गरजेचे आहे. पाणी पेडगावबंधार्यात येणार नसल्याचे लक्षात येताच जिल्ह्यातील तसेच अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वर्गणी गोळा करुन दहा यांत्रिक बोटीला लागणारे डिझेल व काही कामगाराचा खर्च करतात अशा प्रकारचा येथील शेतकऱ्यांनी दुष्काळाशी लढा दिला. यामुळे उस शेती काही अंशता वाचणार आह
एकत्रित येऊन शेतकऱ्यांनी बंधाऱ्यात सोडले पाणी
By admin | Published: May 06, 2017 1:52 AM