पुणे - महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या माध्यमातून पणन मंडळाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवात स्टॉलला आग लागल्याने ६३ आंबा उत्पादक शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे संबंधित आंबा उत्पादक शेतकºयांना कृषी पणन मंडळाच्या माध्यातून त्वरित नुकसान भरपाई द्यावी, असे निर्देश अधिका-यांना देण्यात आले आहेत.ग्राहकांना चांगल्या प्रतीचा हापूस आंबा कमी दरात उपलब्ध व्हावा, तसेच आंबा उत्पादक शेतकºयांच्या आंब्याला चांगला दर मिळावा, या उद्देशाने दरवर्षी पणन मंडळाच्या आवारात आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा मंडळाच्या आवारात ६३ स्टॉल उभारण्यात आले होते. त्यात आंबा उत्पादकांनी आपला दर्जेदार माल विक्रीसाठी आणला होता.मात्र, शुक्रवारी महोत्सवातील स्टॉलना अचानक आग लागली. त्यात स्टॉलधारक शेतकर0यांचे सुमारे ८0 लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे पणन मंडळाने आंबा महोत्सवात झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी काही शेतकºयांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे केली होती. त्यावर सदाभाऊ खोत यांनी संबंधितांना त्वरित आर्थिक साह्य व नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पणन मंडळाचे खासगी सचिव नरेंद्र निकम यांनी पुणे विभागीय कार्यकारी संचालकांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात परिपत्रक पाठविले आहे.दुसरी जागा द्यावीसर्व शेतक-यांकडे आंबा उपलब्ध असून, आणखी एक महिना आंब्याची विक्री करता येऊ शकते. त्यामुळे पणन मंडळाने आंबा महोत्सवासाठी दुसरी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी देवगड परिसरातील आंबा उत्पादक शेतकरी गणपत देवळेकर, सखाराम पुजेरा, संतोष बंडबे, महेश वानिवडेकर तसेच देवगड तालुका आंबा उत्पादक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
आंबा महोत्सवातील शेतकऱ्यांना भरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 3:48 AM