बारामती : रेशीम शेती ही कमी पाण्यावर येऊ शकते. त्यामुळे शेतकºयांनी रेशीम उद्योगाकडे वळण्याची गरज आहे. या रेशीम उद्योगासाठी पुणे जिल्हा बँकच्या माध्यमातून पीक कर्ज भविष्यात उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम संचालनालय नागपूर यांनी रेशीम कोष खुली बाजारपेठ सुरू करण्यास दिलेल्या मान्यतेनुसार रेशीम कोष खरेदी केंद्राचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, बारामती अॅग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार, रेशीम संचालनालय संचालक भाग्यश्री बानायत, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे सचिव डॉ के.एच गोविंदराज, बेंगलोरच्या रेशीम कोष मार्केटचे उपसंचालक जे. एम. मुंशी बसाप्पा, पणनचे संचालक दिपक तावरे, डॉ. उदय जावली, डॉ. कविता देशपांडे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, पंचायत समिती सभापती संजय भोसले, बाळासाहेब तावरे, संभाजी होळकर आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, रेशीम उद्योग हा रोजगार निर्मिती करणारा उद्योग आहे. रेशीम लागवड जोपासना, किटक संगोपन, तुती रोपांचे खर्च, शेड हे एमआरईजीएस योजनेतून शेतकºयांना मिळत आहे. कर्नाटक राज्यातील रामनगर येथील रेशीम कोष मार्केटच्या धर्तीवर येथील रेशीम बाजारपेठ भविष्यात विकसित करण्यात येईल.बाजार समितीचे सभापती अनिल हिवरकर यांनी केले. याअगोदर शेतकºयांना रेशीम कोष विक्रीसाठी रामनगर ,बेंगलोर याठिकाणी जावे लागत होते,मात्र या सुविधेमुळे शेतकºयांची सोय होणार आहे.
शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे वळण्याची गरज : पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 12:00 AM