रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शेतकरी सुभाष निवृत्ती गायकवाड (वय ४७
वर्षे) यांच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला असून, त्यामध्ये ते
गंभीर जखमी झाले आहेत.
वडगाव येथील गायकवाडवस्तीजवळील चासकमान धरणाच्या उजव्या
कालव्याजवळून सुभाष निवृत्ती गायकवाड हे शेतकरी सकाळी सहा वाजता आपल्या
घराकडे चालले होते. त्या वेळी जवळच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने
अचानक त्यांच्यावर हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. या बिबट्याच्या
हल्ल्यात गायकवाड यांच्या गळ्याजवळ व हातावर बिबट्याने चावा घेतला असून,
केवळ नशीब बलवत्तर म्हणून जखमेवर निभावले.
वडगाव व परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्यांचे
वास्तव्य दिसून येत असून, या अगोदर या परिसरातून एक बिबट्या वनविभागाने
पिंजरा लावून पकडून नेलेला आहे. तरी वडगाव ते कडूस या परिसरात बिबटे
नागरिकांच्या नजरेस पडले असून गेल्या पंधरा दिवसांत परिसरातील नागरिकांवर
बिबट्याने एकूण तीन जीवघेणे हल्ले केले आहेत. परंतु या बिबट्याला पकडण्यात
वनविभागास अद्याप यश आले नाही. बिबट्याच्या दहशतीने वडगाव व परिसरातील
शेतकरी धास्तावले असून, शेतातील काम करण्यास शेतकऱ्यांना बिबट्याची भीती
वाटत आहे. तसेच राजगुरुनगर शहरातील अनेक जेष्ठ नागरिक व महिलावर्ग पहाटेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत चांडोली ते वडगाव व गायकवाडवस्ती या परिसरात
फिरण्यासाठी व व्यायामासाठी गर्दी करत असतात. परंतु बिबट्याच्या भीतीने
नागरिकांची संख्या घटली आहे. त्यामुळे परिसरात नागरिक बिबट्याच्या
दहशतीखाली असून, या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी
नागरिकांमधून येत आहे.
“ वडगाव (ता. खेड) येथील गायकवाडवस्ती येथील शेतकऱ्यावर
बिबट्याने केलेल्या प्राणघातक हल्लात शेतकरी सुभाष निवृत्ती गायकवाड
यांना झालेली गंभीर जखम.”
छाया :- विद्याधर साळवे