शिंंदोडी (ता. शिरूर) येथील फडकेवस्ती येथे कृषि संजीवनी सप्ताह सन २०२१-२०२२ अंतर्गत विकेल ते पिकेल या विषयावर चर्चासत्र पार पडले. या वेळी ते बोलत होते. यादरम्यान बोलताना त्यांनी पाचट व्यवस्थापन, जमिनीची सुपीकता वाढवणे, रासायनिक खतांचा मर्यादित वापर करणे याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात आलेगाव येथील सेंद्रिय शेती प्रचारक दिलीप नहार यांनी सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन करताना सेंद्रिय शेतीची सुरवात कशी करावी, प्रमाणीकरण तसेच सेंद्रिय शेतीचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे याबाबत सखोल मार्गदर्शन केले. न्हावरे येथील मंडळ कृषी अधिकारी रेणुका गायकवाड यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी कृषी पर्यवेक्षक कैलास सात्रस, कांतीलाल वीर, कृषी सहायक सुनील नाईक, अंकुश परांडे, जयवंत भगत, पोलीस पाटील भास्कर ओव्हाळ, सरपंच अरुण खेडकर, ग्रामपंचायत समिती गौतम गायकवाड, शिंदोडी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे सर्व सदस्य, लालासो वाघचौरे तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन जयवंत भगत यांनी केले. आभार तेजस फडके यांनी मानले.
--
फोटो क्रमांक : २८ निमोणे विकेल ते पिकेल अभियान
फोटो : शिंदोडी (ता. शिरूर) येथे 'पिकेल ते विकेल' या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना.
===Photopath===
280621\28pun_10_28062021_6.jpg
===Caption===
फोटो क्रमांक : २८ निमोणे विकेल ते पिकेल अभियानफोटो : शिंदोडी (ता शिरूर ) येथे 'पिकेल ते विकेल ' या अभियानांतर्गत शेतकन्यांना मार्गदर्शन करताना .