नीरा - शेतक-यांच्या मुलांनी आता केवळ शेती करून भागणार नाही, तर त्यांनी आता उद्योगपती व्हायला हवे तरच शेतक-याची प्रगती होईल. त्यामुळे आता तरुणांनी शेतीबरोबरच इतर उद्योगधंदे करण्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी केले.नीरा येथे जानकर यांच्या हस्ते मत्स्यव्यवसायिकांना अनुदान वाटप करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष सचिन लंबाते, सुजाता दगडे, पिंपरेचे सरपंच लता थोपटे, उपसरपंच राजेंद्र थोपटे, नीरेचे उपसरपंच बाळासाहेब भोसले, नितीन भोसले, विलास थोपटे, राजू थोपटे, अनिल चव्हाण, राजेश चव्हाण, डॉ. वसंतराव दगडे, प्रादेशिक उपायुक्त मत्स्यविभाग पुणेचे विजय शिखरे, मत्स्यविकास अधिकारी जे.एम. भोसले यांसह नीरा व पिंपरे परिसरातील ग्रामस्थ व मत्स्यव्यावसायिक उपस्थित होते.मत्स्यशेतीमध्ये पन्नास टक्के खर्च खाद्यासाठी होतो आणि आपणाला सध्या इतर राज्यांतून खाद्य आणावे लागते. मात्र आता केंद्र शासनाने नवीन योजना आणली असून, खाद्यनिर्मितीसाठी अनुदान देण्यात येत आहे. प्रकल्प खर्चाच्या ४० टक्के अनुदान अशा उद्योजकांना देण्यात येणार आहे. यात वैयक्तिक व सहकारी तत्त्वावर लाभ घेण्यात येतो. तसेच मत्स्यतळी खोदण्यासाठीही साडेतीन लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. शासनाच्या वतीने राज्यभरात पोर्टेबल हॅचरीची २५ ते ३० युनिट देण्यात येणार आहेत.- विजय शिखरे, उपायुक्त,प्रादेशिक मत्स्य विभाग पुणे
शेतक-यांच्या मुलांनी उद्योगपती व्हावे - जानकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 2:34 AM