लेण्याद्री परिसरात अचानक गारांसह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान झाले. गारांचा आकार 20 ते 30 एम एम एवढा होता.
द्राक्षाची एप्रिल छाटणी होऊन नुकत्याच बागा फुटून आल्या होत्या, त्यास गारांचा जोरदार तडाखा बसला आहे. परिणामी मागील वर्षी प्रमाणेच यंदाही घड निर्मितीला मोठा फटका बसणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.असे द्राक्ष उत्पादक शेतकरी जितेंद्र बिडवई यांनी सांगितले.
कांदा काढणी शेवटच्या टप्यात असल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतात होता, तो भिजल्यामुळे सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. उन्हाळी बाजरी पिके आडवी झाली आहेत. तालुक्यात मोठ्याप्रमाणात टोमॅटो लागवड झाली असून कालच्या गारपिटीमुळे टोमॅटो पिकाबरोबर भाजीपाला व फळपिकांना देखील मोठा फटका बसला आहे.
लेण्याद्री गोळेगाव परीसरात अवकाळी पाऊस व गारपीटीने नवीन लागवड झालेल्या टोमॅटोच्या रोपांचे मोठे नुकसान झाले.