शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

शेतकऱ्यांना मिळणार दिवसा १२ तास वीज; पडीक जमीन ३० वर्षे भाड्याने घेणार: उपमुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 6:08 AM

पाणी फाउंडेशनतर्फे ‘सत्यमेव जयते, फार्मर कप २०२२’ पुरस्कार वितरण साेहळ्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते.

लाेकमत न्यूज नेटवर्क, पुणे : शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्यासाठी ॲग्रीकल्चर फिडर  सौरउर्जेवर आणण्यात येतील. त्यासाठी शेतकऱ्यांची पडीक जमीन ३० वर्षे भाड्याने घेण्यास शासन तयार आहे. या जमिनीची मालकी शेतकऱ्याची असेल. त्यातून शेतकऱ्यांना उत्पन्नही मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

पाणी फाउंडेशनतर्फे ‘सत्यमेव जयते, फार्मर कप २०२२’चा पुरस्कार वितरण साेहळा रविवारी झाला. त्यावेळी फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, यावर्षी ३० टक्के आणि पुढील दोन ते चार वर्षांत उर्वरित सर्व फिडर सौरऊर्जेवर आणण्यात येतील. हा पहिला प्रयाेग २०१७ साली राळेगणसिद्धीला यशस्वी झाला हाेता. ताे राज्यभर राबविण्यात येईल. 

आमिर खान म्हणाले, शेतीला  व्यवसायाच्या दृष्टीने पाहून नवतरुणांनी शेतीकडे वळावे. यातील समस्यांवर मात करून पुढे जावे. शेतकऱ्यांनी गट तयार करून आपल्या क्षमता वाढवाव्यात.

यावेळी पाणी फाउंडेशनचे संस्थापक व चित्रपट अभिनेते आमिर खान, किरण राव, पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, पद्मश्री पाेपटराव पवार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, दिग्दर्शक आशुताेष गाेवारीकर, अभिनेते अतुल कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमात पाणी फाउंडेशनचे ‘राज्यस्तरीय फार्मर कप २०२२’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. २५ लाखांचा प्रथम पुरस्कार अमरावतीच्या परिवर्तन शेतकरी गटाने पटकाविला.

फार्मर कप स्पर्धेतील विजेत्यांची नावे

- प्रथम पुरस्कार : परिवर्तन शेतकरी गट, वाठाेडा, ता. वरूड, जि. अमरावती. रक्कम २५ लाख रुपये- द्वितीय पुरस्कार : चित्रा नक्षत्र महिला शेतकरी गट, गाेळेगाव (ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर.) रक्कम १५ लाख रुपये- संयुक्त तृतीय पुरस्कार : जय याेगेश्वर शेतकरी गट, डांगर बुद्रुक, ता. अमळनेर.रक्कम पाच लाख रुपये- संयुक्त तृतीय पुरस्कार : उन्नती शेतकरी गट, वारंगा, ता. कळमनुरी, जि. हिंगाेली. रक्कम पाच लाख रुपये

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस