आघाडी सरकारच्या काळातच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 01:11 AM2019-03-19T01:11:44+5:302019-03-19T01:12:02+5:30
‘‘ज्या राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्षांचे आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, त्या राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल,’’ असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज इंदापूर येथे दिली.
इंदापूर : ‘‘ज्या राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्षांचे आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, त्या राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल,’’ असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज इंदापूर येथे दिली.
इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन या ठिकाणी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, सोनाई परिवाराचे सर्वेसर्वा दशरथ माने, मंगलसिद्धी परिवाराचे प्रमुख राजेंद्र तांबिले, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले, की मागच्या पंचवार्षिकमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात लोकसभा एकत्रित लढली होती. विधानसभा निवडणुकीतच्या वेळी वेगळा विचार करून निवडणूक लढली, त्याचा परिणाम राज्यातील सत्ता गेली. केंद्रात व राज्यात शेतकरीविरोधी, रोजगारविरोधी भाजपा सरकार सत्तेवर आले. सरकार शेतकरीविरोधी असल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला नाही. भास्कर जगताप, कार्याध्यक्ष अमोल भिसे यांनी सूत्रसंचालन केले. अनिल राऊत यांनी आभार मानले. यावेळी अमोल वीर, नंदकुमार पानसरे, अमोल भोईटे, विठ्ठल ननवरे, दत्ता बाबर, आझाद मुलाणी, अभिजित तांबिले, उमाताई इंगोले, प्रवीण माने, डॉ. शशिकांत तरंगे यांनी मनोगत व्यक्त केले.