PDCC Decision: 'शेतक-यांना सुखाचे दिवस येणार, आता पाच लाखांपर्यंत शून्य टक्क्यांनी कर्ज मिळणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 08:17 PM2021-09-30T20:17:24+5:302021-09-30T20:17:40+5:30

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय

"Farmers will have happy days, now they will get loans up to five lakhs at zero percent." | PDCC Decision: 'शेतक-यांना सुखाचे दिवस येणार, आता पाच लाखांपर्यंत शून्य टक्क्यांनी कर्ज मिळणार'

PDCC Decision: 'शेतक-यांना सुखाचे दिवस येणार, आता पाच लाखांपर्यंत शून्य टक्क्यांनी कर्ज मिळणार'

Next
ठळक मुद्दे२०२० - २१ या आर्थिक वर्षासाठी बँकेने संस्थांना आठ टक्के दराने लाभांश केला जाहीर

पुणे : जिल्ह्यातील लाखो शेतक-यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने मोठी दिवाळी भेट देण्यात आली. शुक्रवारी ३० सप्टेंबरला  झालेल्या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आता यापुढे शेतक-यांना ५ लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्क्यांनी देण्याचा मोठा निर्णय घेतला. तीन लाखांवरील पुढील रकमेचे व्याज बँकेने स्वतःच्या नफ्यातून सोसण्यची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभेत केली, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी दिली.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वार्षिक सर्वसाधारण सभा रमेश थोरात यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संस्थांचे प्रतिनिधी, व्यक्ती सभासद सहभागी झाले होते. सन २०२० - २१ या आर्थिक वर्षासाठी बँकेने संस्थांना आठ टक्के दराने लाभांश जाहीर केला. गेल्या मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेकडे ११ हजार ३२९ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेने आठ हजार १०९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. गेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेला २८२ कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला असून,  नफा वाटण यातील तरतुदी वजा जाता टाइम केला. तर निव्वळ ५५  कोटी दहा लाख रुपयांचा नफा झाला आहे. बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के असल्याचे थोरात यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ऑनलाईन सहभागी झाले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, सध्या बँकेच्या प्रचलित धोरणानुसार तीन लाख रुपयापर्यंत चे पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने सभासद शेतकऱ्यांना दिले जाते. यापुढे ही मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत वाढ करावी. तीन लाख रुपयांच्या पुढील रकमेचे व्याज बँकेने सोसावे अशी सूचना केली. याबाबत सहकार खात्याकडे रीतसर प्रस्ताव पाठवून मान्यता मिळाल्यानंतर या धोरणांची निश्चिती करावी, असे अजित पवार यांनी सुचविले.

Web Title: "Farmers will have happy days, now they will get loans up to five lakhs at zero percent."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.