शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

शेतकरी करणार सोयाबिन बियाणांचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:09 AM

ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत होणार निर्मिती बारामती : मागील दोन वर्षांमध्ये खरीप हंगामात सोयाबीन काढणीच्या काळात झालेल्या अवेळी पावसामुळे सोयाबीन ...

ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत होणार निर्मिती

बारामती : मागील दोन वर्षांमध्ये खरीप हंगामात सोयाबीन काढणीच्या काळात झालेल्या अवेळी पावसामुळे सोयाबीन बियाणे उत्पादन तसेच गुणवत्तेवर मोठा परिणाम झाला आहे. खरीप २०२१ मध्ये सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण होऊ नये आणि सोयाबीन बियाण्यांची उपलब्धता वाढविण्यासाठी कृषि विभागाच्या वतीने ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमाद्वारे स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांमार्फत गुणवत्तापूर्ण बियाण्यांचे उत्पादन करण्यात येत आहे. जेणेकरुन हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण सोयाबीन बियाण्यांची उपलब्धता होऊ शकेल.

मागील हंगामात अतिपावसामुळे ऐन बहरात असलेल्या सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. त्यामुळे यंदा बियाणे टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. तसेच बियाणांच्या किमतीमध्ये वाढ होण्याची देखील शक्यता आहे. त्यावर उपाय म्हणून कृषि विभागाने ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी मागील हंगामात तयार झालेल्या सोयाबीन पिकातून पेरणीयोग्य व पुरेसे बियाणे निवडून कृषि विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे बीज संस्कार करण्यात येत आहे. त्यासाठी गावागावांत कृषि विभागाच्या कर्मचारी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण उपक्रमदेखील राबवत आहेत, अशी माहिती तालुका कृषि विभागाच्या वतीने देण्यात आली.

सोयाबीनची उगवणक्षमता कशी तपासावी...

सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील २ वर्षांपर्यंत वापरात येते.

- शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादनखर्च कमी होईल. मागील दोन वर्षात शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणापासून उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे यंदाच्या वर्षी बियाणे म्हणून शेतकरी पेरणीसाठी वापरु शकतात. तसेच ग्रामबीजोत्पादन, पीक प्रात्याक्षिके योजनांतर्गत आलेल्या उत्पन्नातून बियाण्यांची निवड करता येते.

- प्रमाणित बियाण्यांपासून वरीलप्रमाणे आलेल्या उत्पादनातून चाळणी करून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी.

- सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते त्यामुळे त्याची उगवणक्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळतांना काळजी घ्यावी.

- बियाण्याची साठवणूक करताना आद्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.

- साठवणुकीसाठी प्लॅस्टिक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठवतांना त्याची थप्पी ७ फुटांपेक्षा जास्त उंच असणार नाही याची काळजी घ्यावी.

- बियाणे हाताळतांना जास्त प्रमाणात आदळआपट होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रति हेक्टरी बियाणे दर ७५ किलोवरून ५० ते ५५ किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा प्लॅटरचा वापर करून पेरणी करावी.

- सोयाबीनची उगवणक्षमता ७० टक्केपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे. बियाण्याची पेरणी ३ ते ४ सेंटीमीटरखोलीपर्यंत करावी. • पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बुरशीजन्यरोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. ७५ ते १०० मि मि पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी.

- रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी.

----------------------------

सोयाबिन बियाणांची उपलब्धता वाढवण्यासाठी खरीप हंगाम २०२० मध्ये बारामती तालुक्यात शेतकरी उत्पादक कंपनी व गटामार्फत ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांमार्फत गुणवत्तापूर्ण बीजोत्पादन करून २०२१ साठी जतन करण्याची मोहीम हाती घेतली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी राखून ठेवलेल्या बियाणांची उगवण क्षमता चाचणी करणे गरजेचे आहे.

- दत्तात्रय पडवळ

तालुका कृषि अधिकारी, बारामती

------------------------------

बारामती तालुक्यात कृषि विभागाचे कर्मचारी ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणांच्या निर्मितीबाबत मार्गदर्शन करताना.

१८०४२०२१-बारामती-०५