वायू चक्रीवादळामुळे मॉन्सूनची वाटचाल थंडावली. त्यामुळे अजूनही कोकणात मॉन्सून दाखल झालेला नाही. थोड्याफार प्रमाणात जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी लागली. परंतु, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणे रिकामी झाली असून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागल्याचे दिसून येत आहे........बेल्हा : बेल्हा (ता. जुन्नर) व परिसरातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. येथे काही दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली होती. तो पाऊस कमी प्रमाणात झाला. पाऊस उशिरा होत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नैराश्य पसरले आहे. परिसरातील कूपनलिका, विहिरी यांचे पाणी खोल गेल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. ठिकाणी कूपनलिका व विहिरी आटल्या आहेत. शेतातील ढेकळेही अद्याप फुटलेली नाहीत. खरीप हंगामातील पिकांची पेरणी उशिरा करावी लागत असल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी पसरली आहे. तसेच काही ठिकाणी तर अद्याप पाऊस झाला नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. शेतकरी वर्गाने शेतात शेणखत टाकले आहे. काही शेतकऱ्यांनी पेरणीचे बी-बियाणे खरेदी करुन ठेवले आहेत. पाऊस जर लवकर झाला नाही तर ते वाया जाण्याची भीती शेतकरीवर्गातून व्यक्त केली जात आहे. शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागून राहिले आहेत.......ढग दाटून आले; पण पाऊस पडेनानेरे : भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील नेरे, आंबवडे (ता. भोर) परिसरात गेल्या आठवडाभरापासून ढगाळ हवामान होऊन पावसाचे वातावरण तयार होत आहे. मात्र पाऊस पडत नसल्याने तसेच पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकरी सर्वत्र चिंतातूर झाले असल्याचे चित्र दिसत आहे.परिसरात एकीकडे शेतीची मॉन्सूनपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली असली तरी पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने शेतकरी अद्यापही वरुणराजाच्या प्रतीक्षेत आहेत. रोहिणी नक्षत्रामध्ये वळवाचा पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती; मात्र रोहिणी नक्षत्र कोरडेठाक गेल्याने बळीराजाची आशेची निराशा होऊन बसली आहे. पावसाचे वातावरण चांगले तयार झाल्याने यावर्षी मृग नक्षत्रालाच पेरण्या होण्याची दाट शक्यता होती. शेतकऱ्यांनीही मॉन्सूनपूर्व शेतीची मशागत करून ठेवली होती. मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत.नेरे, आंबवडे (ता. भोर) परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने पाऊस वेळेत पडणे आवश्यक आहे. प्रामुख्याने या परिसरात भातपिक मोठ्या प्रमाणावर उत्पादित केले जाते. भातपिकाला पावसाची मोठी गरज आहे. परंतु पाऊस वेळेत झालाच नाही तर येथील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे.............मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच म्हणजे ७ जूनला वरुणराजाचे हलके आगमन झाल्याने सर्वांनाच सु:खद धक्का बसला होता. परंतु त्यानंतर त्याने दांडी मारली. त्यामुळे या वर्षी वर्तविण्यात आलेल्या सर्व अंदाजांना खोटे ठरवत पाऊस लांबल्याने बळीराजा चिंतातुर झाला असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. पहाटेपासूनच पावसाचे ढग आकाशात दिसतात; परंतु त्याचे रूपांतर पाण्यात होत नसल्याने तो कधी बरसणार यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे मशीगतीची सर्व कामे पूर्ण झाली असली, तरी पेरणीयोग्य पावसाची अद्याप प्रतीक्षा कायमच आहे. २५ मे रोजी रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर वळवाचा पाऊस पडेल ही अपेक्षा शेतकºयांसह सर्वांनाच होती. परंतु रोहिणी नक्षत्र सालाबादप्रमाणे कोरडे ठणठणीत गेले. गेले काही वर्षे पुणे जिल्ह्यात वळवाचा पाऊस पडलेला नाही. या वर्षीही तो पडला नाही. समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यासह अनेकांनी वर्तविला असल्याने व मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.
अनेक वर्षानंतर यावर्षी मृग नक्षत्रातच पेरणी होण्याची दाट शक्यता यामुळे निर्माण झाली होती. शेतकऱ्यांनीही मशागतीची कामे वेगाने केली. उसनवारी किंवा जसे जमेल तसे खते, बियाण्यांचे नियोजनही केले. शेतकरी पेरणीच्या तयारीत असतानाच अचानक पावसाने दडी मारली. यानंतर आज येईल, उद्या येईल असे करता-करता बरेच दिवस उलटले. तूर्तास आभाळाकडे नजरा लावून बसण्यापलीकडे शेतकऱ्यांच्या हाती सध्यातरी काही उरले नाही.बळीराजा आपली सर्व दु:खे विसरून यावर्षी तरी निसर्ग आपल्याला साथ देईल म्हणून रखरखत्या उन्हात शेतीच्या मशागतीचे कार्य जोमाने करू ..............मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. यावर्षी लवकर पेरणी करायची या आशेने अनेक शेतकऱ्यांनी बियाणे, खताची खरेदी केली. पावसाचे वातावरण असल्याने बियाणे विक्रीच्या दुकानांवर गर्दी केली. खरेदीत आलेली तेजी पाहता विक्रेत्यांनीही थोड्याफार फरकाने जादा दर आकारत पैसा वसूल करण्याचा प्रयत्न केला. पावसाचे वातावरण पाहून शेतकºयांनाही घासाघीस न करता, बियाणे व खत खरेदी केली. यातून कमी-अधिक प्रमाणात अनेक शेतकऱ्यांना जादा पैसेही मोजावे लागले. हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये पावसाळ्यात प्रामुख्याने बाजरीचे पीक घेतले जाते. जून महिन्यात पाऊस पडल्यानंतर बाजरीची पेरणी करतात. यंदा मात्र पावसाने दडी मारल्याने बाजरीची अजिबात पेरणी झालेली नाही. बाजरीचे पीक काढल्यानंतर त्याच शेतात कांद्याचे पीक केले जाते. दीड महिन्यापूर्वी नवा मुठा उजव्या कालव्याचे आवर्तन बंद झाल्यामुळे हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील शेतीला व पिण्याच्या पाण्याची प्रथमच अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे.