शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

फरांदे अ‍ॅकॅडमीला विजेतेपद

By admin | Published: May 12, 2017 5:31 AM

रोहित हाडके (३/१९ व ३८), ओम फरांदे (४/२९), रौनक हरफाळे (५३) यांच्या खेळामुळे फरांदे क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने अंतिम सामन्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : रोहित हाडके (३/१९ व ३८), ओम फरांदे (४/२९), रौनक हरफाळे (५३) यांच्या खेळामुळे फरांदे क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने अंतिम सामन्यात स्टेडियम क्रिकेट क्लबचा ७ गडी राखून पराभव करीत फरांदे करंडक १६ वर्षांखालील अंतरअ‍ॅकॅडमी क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद जिंकले. फरांदे क्रिकेट अ‍ॅकॅडमीतर्फे आयोजित पूना क्लबच्या मैदानावर झालेल्या सामन्यामध्ये स्टेडियम क्रिकेट क्लब संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २४.४ षटकांत १० गडी बाद १०६ धावा केल्या. स्टेडियम संघाकडून अखिलेश गवाली २८ व करण स्वामी २१ यांनी केलेल्या धावांच्या जोरावर शंभर धावांचा टप्पा गाठला. फरांदे संघाकडून ओम फरांदे (४-२९) व रोहीत हाडके (३-१९) यांनी गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली. हे आव्हान फरांदे क्रिकेट अ‍ॅकॅडमीने २०.१ षटकांत व ३ गडी गमावून पूर्ण केले. रोहीत हाडके (३८) व रौनक हरफाळे (५३) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण स्पर्धा संचालक अभिजित फरांदे यांच्या हस्ते करण्यात आला. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना करंडक आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले. वैयक्तिक पारितोषिके : सर्वोत्कृष्ट फलंदाज : यश जगदाळे (फरांदे सीए); सर्वोत्कृष्ट गोलंदाज : सार्थक वाळके (फरांदे सीए); अष्टपैलू खेळाडू : आदित्य मोरे (क्रिकेट मास्टर अ‍ॅकॅडमी); मालिकावीर : ओम फरांदे (फरांदे सीए).संक्षिप्त धावफलक : स्टेडियम क्रिकेट क्लब : २४.४ षटकांत सर्वबाद १०६ (अखिलेश गवाली २८, करण स्वामी २१, ओम फरांदे ४-२९, रोहीत हाडके ३-१९) पराभूत वि. फरांदे क्रिकेट अ‍ॅकॅ डमी: २०.१ षटकांत ३ गडी बाद ११० धावा (रोहित हाडके ३८, रौनक हरफाळे ५३, सनथ परदेशी १-१३); सामनावीर: रोहित हाडके (फरांदे सीए)