नीरा : पुरंदर तालुक्यातील गुळूंचे कर्नलवाडी परिसरातील सहा गावांचा विरोध असणाऱ्या खडीमशीन विरोधात आमरण उपोषणाला सोमवारी (दि. २७) सकाळी ११ वाजल्यापासून सुरवात झाली आहे. परिसरातील १७ ग्रामस्थ उपोषण करत असुन सुमारे ३०० ग्रामस्थ या आंदोलनासाठी सासवडच्या प्रांत कार्यालयासमोर बसुन आहेत.
गुळूंचे कर्नलवाडीसह पिंपरे, थोपटेवाडी, पिसुर्टी, वाल्हे, सुकलवाडी ग्रामस्थांचा विरोध असतानाही नियोजित खडीमशीन टाकण्याच्या हलचाली सुरुच आहेत. गुळूंचे ग्रामस्थांनी खडिमशीन विरोधात भुमिका घेण्याआधी बारामती तालुक्यातील सोमेश्वरचे संचालक शैलेंद्र रासकर यांना नियोजित खडिमशीनचा प्रकल्प टाकू नये, आमचा खडिमशीनला विरोध असल्याचे बैठकीत सांगितले. त्यानंतरही रासकर यांनी नियोजित खडिमशीच्या ठिकाणी जिलेटीनचा स्फोट उडवल्याने लगतच असणाऱ्या बोलाईमातेच्या प्रचिन गुफेत हदरे बसल्याने ग्रामस्थांनी जेजुरी पोलीसांत तक्रार अर्ज दाखल केला. यानंतरही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा. या दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची भेट घेतली. मागील आठवड्यात खा.सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा घडवली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थ समाधानी झाले नाहीत. सोमवारी सकाळी बोलाईमातेला अभिषक घालून गुळूंचे कर्नलवाडी परिसरातून महिला व ग्रास्थांनी सासवड येथील उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. यावेळी शिवसेनेचे अतुल म्हस्के, माणिक निंबाळकर, हरीभाऊ लोळे, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदिप पोमण, विठ्ठल मोकाशी, संभाजी कळाणे, भाग्यवान म्हस्के, राष्ट्रवादी कॉंग्रसचे अशोक टेकवडे, प्रा.दिगंबर दुर्गाडे, सुदाम इंगळे, पुष्कराज जाधव, विराज काकडे,बंडूकाका जगताप, शेतकरी संघटनेचे दिलीप गिरमे, भा.ज.पा.चे गंगाराम जगदाळे, सचिन लंबाते, साकेत जगताप, अमोल जगताप, नवनाथ बरकडे, यांसह सर्वपक्षांचे पदाधिकाऱ्यांनी या खडिमशीन विरोधात समर्थन देत आंदोलनाला पाठिंबा दिला.