लसवाहक बॉक्समधील तापमान दीर्घकाळापर्यंत टिकवून ठेवता येऊ शकते. त्यामुळे लसींची साठवणूक आणि वाहतूक सहजपणे केली जाऊ शकते. डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचारी कोणत्याही पॉवर बॅकअपशिवाय हे बॉक्स सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतूनही घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे दुर्गम भागात लसवाहकाच्या मदतीने ४ दिवसांमध्ये २००० नागरिकांचे लसीकरण होऊ शकते, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. लसवाहकाची कार्यक्षमता आणि परिणामकारकता तपासण्यासाठी सर्व प्रकारच्या चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी हैदराबाद विमानतळावर स्फुटनिक लसीचे डोस रशियातून पहाटे पावणेचार वाजता दाखल झाले. कुलेक्सच्या लसवाहकांमधून इत कमी वेळेत हे डोस डॉ. रेड्डीज लॅब येथे पोहोचवण्यात आले. सध्या लस साठवणूकची क्षमता आणि वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पोर्टेबल लसवाहकांमुळे यंत्रणेवरील ताण हलका होऊ शकणार आहे.