लोकमत न्यूज नेटवर्कवडगाव निंबाळकर : फिर्याद देण्यासाठी आलो असता वडगाव निंबाळकर पोलीस ठाणेतील पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. मारहाण करणाऱ्या पोलिसांचे निलंबन करावे, या मागणीसाठी येथील पोलीस ठाण्यासमोर कोऱ्हाळे खुर्द नानासोा खोमणे यांनी गुरुवारी (दि. १) दुपारी दोनपासून उपोषण सुरू केले आहे.कोऱ्हाळे खुर्द गावात गावडे व खोमणे या दोन कुटुंबात शनिवारी (दि. २७) भांडणे झाली होती. याची फिर्याद देण्यासाठी सुरुवातीला नानासोा खोमणे वडगाव पोलीस ठाण्यामध्ये गेले असता येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी विरोधी गावडे गटाला बोलावून घेत त्यांच्यासमोर तीन पोलिसांनी नाहक नानासोा यांच्यासह तिघांना मारहाण केली. यामध्ये नानासोा यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. मारहाण प्रकरणाबाबत पोलिसांची चौकशी व्हावी. बेदम मारहाण करणाऱ्या त्या तिघा पोलिसांवर निलंबनाची कारवाई व्हावी, या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. जो पर्यंत निलंबन होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा निर्धार उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. उपोषणाबाबत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता दोन गटांत पोलीस ठाण्यासमोरच भांडणे झाली. यामध्ये नानासोा व इतरांना लागले आहे. ठाणे आवार : दोन गटांवर कारठाण्याच्या आवारात भांडणे केल्याच्या कारणावरून दोन्ही गटांतील लोकांवर कारवाई केली आहे. याबाबत तक्रार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आहे. न्यायालयाचे पुढील आदेश येताच योग्य ती कारवाई करण्यात येईल, त्यामुळे उपोषण करू नये, अशी नोटीस नानासोा खोमणे यांना बजावली आहे. तरीही उपोषण सुरू केल्याने ते बेकायदेशीर आहे.
पोलिसांच्या विरोधात उपोषण
By admin | Published: June 02, 2017 1:47 AM