अष्टविनायक मार्ग हा दौंड शहरातून मार्गस्थ होत असल्याने या रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते नवयुग शिक्षण संस्था या दरम्यानची अतिक्रमणे अद्याप काढलेली नसल्याने सदरचा रस्ता नियमबाह्य आणि कमी रुंदीचा होत आहे. आंदोलकांनी यापूर्वी दौंड नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस स्टेशनला लेखी निवेदनाद्वारे कळवून देखील या नागरी समस्याकडे दुर्लक्ष झाल्याने नाईलाजास्तव आमरण उपोषणाला सुरुवात करावी लागली असे उपोषकर्त्यांनी सांगितले.
भविष्यात शहारातील लोकसंख्या वाढ आणि वाहतूकीचा विचार करता सदरचा रस्ता तयार करताना या मार्गावरील अतिक्रमणे काढणे गरजेचे आहे. मात्र अद्याप अतिक्रमणे काढली गेली नाही. परिणामी अष्टविनायक रस्त्याचे काम सुरु आहे ते देखील नियमबाय अरुंद स्वरुपात वास्तविक पाहता दौंड नगर परिषदेने २९ डिसेंबर २००७ साली शहरातील वाढीचा आणि वाहतुकीचा विचार करुन नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव करुन अतिक्रमणे काढलेली आहेत.मात्र सद्याच्या परिस्थिततीत अतिक्रमणे का काढली जात नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
२६ दौंड
अष्टविनायक रस्त्यासाठी आतिक्रमणे काढावी म्हणून सुरु असलेले आमरण उपोषण.