उपोषण लवकर सोडावे; आरोग्य बिघडणार नाही, अजित पवार यांचा चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 05:10 AM2020-01-28T05:10:58+5:302020-01-28T05:15:01+5:30

'मराठवाड्याच्या त्याच प्रमुख होत्या, त्याच्याच विचारांचे गिरीश महाजन जलसंपदा खात्याचे मंत्री होते.'

Fasting should be released early; Health will not deteriorate, Ajit Pawar's tweak | उपोषण लवकर सोडावे; आरोग्य बिघडणार नाही, अजित पवार यांचा चिमटा

उपोषण लवकर सोडावे; आरोग्य बिघडणार नाही, अजित पवार यांचा चिमटा

Next

पुणे : पंकजा मुंडे या पाच वर्षे सरकारमध्ये होत्या. त्याच्याच विचारांचे सरकार होते. मराठवाड्याच्या त्याच प्रमुख होत्या, त्याच्याच विचारांचे गिरीश महाजन जलसंपदा खात्याचे मंत्री होते. त्यावेळेस काही अडचणी आल्या असल्यास मला माहिती नाही.
सध्या लोकशाही मार्गाने त्या उपोषण करण्यासाठी बसल्या आहेत, फक्त उपोषण लवकर सोडवावे म्हणजे पुढच्या अनेक गोष्टी टळतात. उपोषण लवकर सोडावे म्हणजे आरोग्य देखील बिघडणार नाही, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
आमचे पुरंदरचे विजय शिवतरे यांनी मला इतक्या वेळा ऐकवले की, दादा मी उपोषणाला बसलो तेव्हा तुम्ही लवकर सोडवायला
आला नाहीत, म्हणून मला त्रास होतो, आरोग्य बिघडले. कुणाचेही आरोग्य बिघडू नये म्हणून मुंडे यांनी उपोषण मागे घ्यावे. काही
प्रश्न असतील तर जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांची बैठक लावून मार्गी लावता येतील, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Fasting should be released early; Health will not deteriorate, Ajit Pawar's tweak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.