पुणे : पंकजा मुंडे या पाच वर्षे सरकारमध्ये होत्या. त्याच्याच विचारांचे सरकार होते. मराठवाड्याच्या त्याच प्रमुख होत्या, त्याच्याच विचारांचे गिरीश महाजन जलसंपदा खात्याचे मंत्री होते. त्यावेळेस काही अडचणी आल्या असल्यास मला माहिती नाही.सध्या लोकशाही मार्गाने त्या उपोषण करण्यासाठी बसल्या आहेत, फक्त उपोषण लवकर सोडवावे म्हणजे पुढच्या अनेक गोष्टी टळतात. उपोषण लवकर सोडावे म्हणजे आरोग्य देखील बिघडणार नाही, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.आमचे पुरंदरचे विजय शिवतरे यांनी मला इतक्या वेळा ऐकवले की, दादा मी उपोषणाला बसलो तेव्हा तुम्ही लवकर सोडवायलाआला नाहीत, म्हणून मला त्रास होतो, आरोग्य बिघडले. कुणाचेही आरोग्य बिघडू नये म्हणून मुंडे यांनी उपोषण मागे घ्यावे. काहीप्रश्न असतील तर जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांची बैठक लावून मार्गी लावता येतील, असे त्यांनी सांगितले.
उपोषण लवकर सोडावे; आरोग्य बिघडणार नाही, अजित पवार यांचा चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 5:10 AM