पुणे : राज्य शासनाने धनगर समाजाला आरक्षणाच्या मागणीबाबत गेल्या चार वर्षांपासून केवळ झुलवत ठेवले, असा आरोप धनगर आरक्षण कृती समितीने केला. तसेच आरक्षण मिळविण्यासाठी धनगर समाजाने रविवारी ‘कृती आराखडा’ तयार केला. त्यानुसार येत्या १0 आॅगस्ट रोजी पुण्यातील विधान भवनावर लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. त्यानंतर तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे.धनगर आरक्षण कृती समितीची राज्यव्यापी बैठक रविवारी पुण्यात पार पडली. त्यात आरक्षणाची मागणी मान्य करून घेण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला. या बैठकीस जलसंधारणमंत्री राम शिंदे, माजी मंत्री अण्णा डांगे, आमदार दत्तात्रय भरणे, रामराव वडकुते, रामहरी रुपनवर, माजी आमदार हरिभाऊ बधे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, नानाभाऊ कोकरे यांच्यासह कृती समितीचे मदन देवकाते, परमेश्वर कोळेकर, विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ८ सप्टेंबर रोजी चौंडी येथे दुपारी एका वाजता समाजाचा महामेळावा आयोजित करण्याचा ठराव या वेळी करण्यात आला.>मुख्यमंत्र्यांसोबत बैठकधनगर आरक्षण समितीची येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राम शिंदे यांनी या वेळी स्पष्ट केले. तसेच येत्या १० आॅगस्ट रोजी पुण्यातील विधानभवनासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.त्यात आजी-माजी आमदार व समाजाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्याचा तसेच येत्या २४ आॅगस्ट रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
धनगर आरक्षणासाठी १० आॅगस्टला उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 1:02 AM