शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Pune: सासवड-कापूरहोळ रस्त्यावर भीषण अपघात; महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू, बाळासह दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 6:53 PM

महिलेच्या दोन वर्षाच्या बाळासह अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत...

सासवड (पुणे ) :भोर तालुक्यातील किकवीकडून कापूरहोळ मार्गे सासवडकडे जाणारी वॅगनर कार आणि सासवडकडून कापूरहोळकडे निघालेला १२ चाकी ट्रक यांच्यात चीव्हेवाडी जवळील देवडी येथे जोरदार घडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, धडक होताच कार थेट ट्रकच्या खाली गेली. यामध्ये कारच्या चालकासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर महिलेच्या दोन वर्षाच्या बाळासह अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

गणेश उर्फ बाळासाहेब शिवाजी लेकावळे (वय २८. रा. किकवी, ता. भोर) आणि तृप्ती अक्षय जगताप (वय २६. रा. सुपे खुर्द ता. पुरंदर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे असून मयत तृप्ती यांचा दोन वर्षाचा मुलगा कृष्णा अक्षय जगताप याच्यासह प्रकाश बाबुराव दरेकर (रा. धावडी, ता. भोर) हे जखमी आहेत. याबाबत रोहिदास पांडुरंग लेकावळे यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आली असून ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर ट्रकचा चालक फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मयत गणेश शिवाजी लेकावळे हे हडपसर येथील एका कंपनीत कामाला असून नेहमीप्रमाणे ते त्यांची वॅगणार कार क्रमांक एम एच १४ डी टी ९५८७ मधून सकाळी लवकर कामाला निघाले होते. तसेच मयत तृप्ती अक्षय जगताप त्यांच्या माहेरी किकवी येथे गेल्या होत्या. मयत लेकावळे यांच्या शेजारीच त्यांचे माहेर असून त्यांच्याच गाडीत बसून सासवड कडे निघाले होते. 

दरम्यान सकाळी ८.३० च्या दरम्यान वॅगणर कार पुरंदर तालुक्यातील देवडी गावच्या हद्दीतील पहिल्या वळणावर असताना समोरून येणाऱ्या एमएच १५ डीके ४२४७ या अशोक लेलंड कंपनीच्या १२ चाकी ट्रकवरील चालकाने समोरासमोर जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, कार थेट ट्रकच्या खाली घुसून दबली गेली. त्यामुळे त्यातील चालक गणेश शिवाजी लेकावळे यांच्या सह शेजारील सीट वरील बसलेल्या तृप्ती अक्षय जगताप यांना जोरदार मार लागून जागीच मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त समजताच सासवडचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आले.  

अपघात घडल्यानंतर पुढील सीटवरील चालक आणि महिलेचा जागीच मृत्यू झाला. मात्र अपघातात ट्रक आणि कार यांची समोरसमोर धडक झाल्यानंतर महिलेच्या मांडीवरील दोन वर्षाचा कृष्णा मागच्या सीटवर फेकला गेला त्यामुळे त्यास काही प्रमाणात दुखापत झाली आणि सुदैवाने तो वाचला. परंतु लहानपणीच त्याच्या डोक्यावरील आईचे छत्र कायमचे हरपले. सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यंसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPurandarपुरंदरbhor-acभोर