कर्वेनगर : काम चालू असलेल्या आणि अनेक वर्षांपासून रखडलेल्या कर्वेनगर उड्डाणपुलाला धडकून दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु असून, दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.याबाबत सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजेंद्र इंगळे आणि दिनेश राजेंद्र इंगळे असे जखमी झालेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत. दोघेही काल रविवार (दि. ४) रात्री अकराच्या सुमारास कोथरूड वरून वारजेच्या दिशेने जात असताना, वनदेवी मंदिर परिसर ओलांडल्यावर कर्वेनगर पोलीस चौकीसमोर आले असताना, दुचाकी चालवणाऱ्या दिनेश इंगळे यांचे नियंत्रण सुटल्याने, दुचाकी उड्डाणपुलाचे काम चालू असलेल्या पिलरला जोरात धडकली.अपघात झाल्यावर जोराचा आवाज झाल्याने कर्वेनगर पोलीस चौकीत हजर असलेले पोलीस नाईक बालारफी शेख, पोलीस शिपाई संतोष गवारी, ज्ञानेश्वर कुंभार यांनी तत्काळ बाहेर धाव घेतली असता, त्यांना गंभीर अपघाताचे चित्र दिसले. दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती, घटनास्थळी रक्त पहायला मिळत होते. त्या परिस्थितीत पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने दोघांनाही खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलवले. त्यानंतर प्रथमोपचार करून, ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दोघेही गंभीर जखमी झालेले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते आहे.या उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन जवळपास ४ वर्ष पूर्ण होत आहेत. दोन उड्डाणपुलांचे काम पूर्ण करण्याकरिता ठेकेदार कंपनी सिम्प्लेक्सला अडीच वर्षांची मुदत देण्यात आली होती. मात्र त्यातील एक पूल देखील अद्याप पूर्ण होऊ शकलेला नाही. त्यामुळे अपघातांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली आहे.
उड्डाणपुलाला धडकून पिता-पुत्र गंभीर जखमी; कर्वेनगर उड्डाणपुलाचे रखडलेले काम कारणीभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 12:00 PM
काम चालू असलेल्या आणि अनेक वर्षांपासून रखडलेल्या कर्वेनगर उड्डाणपुलाला धडकून दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु असून, दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ठळक मुद्देराजेंद्र इंगळे आणि दिनेश राजेंद्र इंगळे असे जखमी झालेल्या पिता-पुत्रांची नावेउड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन जवळपास ४ वर्ष पूर्ण, त्यामुळे अपघातांच्या संख्येत प्रचंड वाढ