शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
2
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
3
प्रेमाचा जांगडगुत्ता! मुलीच्या सासऱ्यासोबतच ममता झाली फरार; महिलेच्या पतीला दुःख अनावर
4
५ वर्षांपूर्वी मृत्यू झालेला 'तो' रिक्षा चालवताना सापडला; पत्नीशी WhatsApp वर चॅटिंग, अखेर...
5
एका शेअरवर ₹११७ चा डिविडेंड देतेय कंपनी, रेकॉर्ड डेट आता जास्त दूर नाही; पाहा कोणता आहे शेअर?
6
कोट्याधीश करणारा वसुमती योग: ८ राशींना शुभ, उत्पन्न वाढेल; हाती पैसा राहील, लाभच लाभ होतील!
7
Mumbai: बीएमसीने 'अभय' देऊनही मुंबईकरांनी केलं दुर्लक्ष, आता भरा दोन टक्के दंड 
8
चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!
9
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
10
मुंबई: स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी पत्नीला पाठवला व्हिडीओ, म्हणाला, 'जगण्याची इच्छा नाही'
11
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
12
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
13
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली
14
फळं खावीत की ज्यूस प्यावा... आरोग्यासाठी काय फायदेशीर? डाएटीशियनने दूर केलं कन्फ्यूजन
15
JEE Main Result 2025: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! जेईई परीक्षेत राज्यातील तिघांना १०० टक्के गुण
16
तनिषा भिसेंना न्याय मिळणार का? चौकशी अहवालांच्या खेळात गांभीर्य हरवले, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
17
"गारगाई धरणाला विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू", आमदार भातखळकरांचा ठाकरेंना इशारा
18
मराठी भाषेचं नुकसान आम्ही सहन करणार नाही; हिंदी भाषेची सक्ती, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा
19
"हे बघ, तुझा मुलगा मेला"; डोक्यात खिळा ठोकून चिमुकल्याची निर्घृण हत्या, आईला दिला मृतदेह
20
आयपीएलदरम्यान बीसीसीआयने मुंबई टी२० लीग संघाच्या मालकावर घातली आजीवन बंदी, कारण काय?

स्वतःचा प्लॉट विकून वडिलांनी तिला अंतराळ शास्रज्ञ बनवलं; आता देशातील तरुणांसाठी तिने 'कौतुकास्पद' पाऊल उचललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 15:30 IST

आपल्या वाट्याला आलेल्या अफाट संघर्षाला जिद्द आणि अपार मेहनतीने सामोरे जात देशातील बांधवांना करिश्माने 'ऑनलाईन स्पेस कॅम्प'च्या माध्यमातून धडे देण्यास सुरुवात केली आहे.

प्रशांत ननवरे - बारामती : अंतराळ शास्त्रज्ञ बनलेल्या बारामतीकर तरुणीने देशातील युवा पिढीला अंतराळ क्षेत्राचे धडे देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. करिश्मा सलाउद्दीन इनामदार असे या तरुणीचे नाव आहे. जगात अंतराळ क्षेत्राची माहिती देण्यासाठी करिश्माने प्रथमच 'ऑनलाईन स्पेस कॅम्प' सुरु केला आहे.

बारामती येथील एका सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असतानाही प्रबळ इच्छा शक्तीच्या बळावर करिश्मा अंतराळ शास्त्रज्ञ बनली आहे. साहसी कल्पना चावलामुळे तिला स्फूर्ती मिळाली. लहानपणापासूनच तिचे अंतराळवीर शास्रज्ञ बनण्याचे स्वप्न होते. तिने कधी विसर पडू दिला नाही, त्यामुळे लहानपणापासूनच करिश्माचा 'स्पेस' प्रवास सुरू झाला. 

आयुकात ज्येष्ठ शास्रज्ञ डॉ. जयंत नारळीकरांचे मार्गदर्शन लाभले. तिने डिप्लोमा डिग्री इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधून केली.तिच्या वडिलांनी स्वत:चा प्लॉट विकून तिच्या शिक्षणाची व्यवस्था केली. सप्टेंबर २०१४ मध्ये ती फ्रान्स येथील विद्यापीठात एमएससाठी रुजू झाली. इथे उच्चशिक्षण घेताना तिला जर्मनी, लुक्दोवर्ग, नेदरलँड्स, शिया आणि अजून ६ देशात जाण्याची संधी मिळाली. अंतराळात जाण्यासाठी आवश्यक ज्ञान मिळविण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहे.

करिश्मा सध्या यूएसएमध्ये झायडायनामिक्स येथे आंतराळशास्त्रज्ञ,अंतराळ अभियंता म्हणुन कार्यरत आहे. आपल्या वाट्याला आलेल्या संघर्षातून देशातील बांधवांना तिने ऑनलाईन स्पेस कॅम्पच्या माध्यमातून धडे देण्यास सुरवात केली आहे.मात्र, हे काम देशपातळीवर पोहचविण्यासाठी करिश्माला राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्थेची गरज आहे. त्यासाठी ‘thenextspacegeneration@gmail.com’ या मेल सह Website: thenextspacegeneration.com  यावर संपर्क साधावा,असे आवाहन करिश्माने केले आहे.

परदेशात विद्यार्थ्यांसाठी फावल्या वेळात उच्च ध्येय गाठण्याची स्वप्न मनावर बिंबवली जातात. त्यासाठी मोठ्या सायन्स अ‍ॅकॅडमी, स्पेस कॅम्प आदी संकल्पना राबविली जातात. त्याची सुमारे एक ते दीड लाख रुपये फी असते. आपल्याकडे असल्या प्रकारच्या सुविधा नाहीत. विद्यार्थ्यांना त्याची ओळख देखील नाही. केवळ इंजिनिअर, डॉक्टर, वकील आदी शिक्षणाच्या मागे युवा पिढी धावते. नवीन संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नाही.

या पार्श्वभूमीवर कश्मा हिने तिची मैत्रीण युरोप(पोलंड) येथील मेकॅ ट्रॉनिक्स अभियंता असलेल्या मार्ता पॅनकोवास्का सह ‘द नेक्स्ट स्पेस जनरेशन’च्या माध्यमातुन ऑनलाईन स्पेस कॅम्प आयोजित केला. फ्रान्स येथील आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठाचे अंतराळतज्ञ प्रा.निमाह शॉ, ऑस्ट्रेलिया येथील अ‍ॅस्ट्रोबायोलॉजिस्ट जेम्स बेव्हींग्टन, कॅलिफोर्नियाच्या स्पेस रोबोटिक्सच्या निमिषा मित्तल, भारतातील निर्मल गद्दे यांच्यासह करिश्माने हा स्पेस कॅम्प आयोजित केला आहे. जुलै महिन्यात त्यासाठी २०० विद्यार्थ्यांसाठी प्रवेश मिळविला होता. मात्र यामध्ये बारामती शहरासह भोर आणि पुण्यातील आदित्य बोधे,इशान चंपानेरकर,वरद पाटील,मंदार राजमाने,प्रसन्न चित्रगार,लायबा शेख,श्रेया श्रीराम,ज्ञानेश्वरी काळे,तनिष्का गावडे,श्रावणी शिंगाडे या १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये यावेळी विद्यार्थ्यांना आंतराळ शास्त्रज्ञ बनण्यासाठी कठीण प्रक्रियेतून जाण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच मंगळग्रहावर जाण्याच्या कालावधीबाबतचे ‘असाईनमेंट’ देण्यात आले.

मंगळ ग्रहावर वादळ आल्यावर तोंड कसे देणार,तसेस मंगळावर घर कसे बनवणार, घराला लागणारे मटेरियल, पाणीपुरवठा, मंगळगृहावर शरीरावर होणारे परिणाम आदी अवघड अशक्य असणारे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आले. अगदी आंतराळ शास्त्रज्ञ विचार करतात त्याचप्रमाणे आठ दिवस विचार करत विद्यार्थ्यांना त्या भूमिकेत ठेवण्यात आले. यामध्ये आंतराळवीर, आंतराळशास्त्रज्ञ, कमांडर आदी भूमिकेत विद्यार्थ्यांना ठेवण्यात आले.

करिश्मा इनामदार हिने लोकमतशी बोलताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी केवळ डॉक्टर, इंजिनिअरभोवती घुटमळून चालणार नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय ठेवण्याची मानसिकता निर्माण करायला हवी. आजही देशात ए.पी.जे. अब्दुल कलाम, कल्पना चावला निर्माण होण्याची गरज आहे. यासाठी भारतात टप्याटप्याने काम हाती घेणार आहे.————————————————

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीscienceविज्ञानStudentविद्यार्थी