शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

महापालिकेला बालगंधर्वांचा विसर

By admin | Published: June 26, 2017 4:06 AM

बालगंधर्व रंगमंदिराच्या उत्तम वास्तूतून आपल्याला पन्नास वर्षे कलेचा आस्वाद घेता आला आहे. रंगमंदिराचा सुवर्ण महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बालगंधर्व रंगमंदिराच्या उत्तम वास्तूतून आपल्याला पन्नास वर्षे कलेचा आस्वाद घेता आला आहे. रंगमंदिराचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. कारण, हे रंगमंदिर पालिकेने उभारले आहे. मात्र महापालिकेला बालगंधर्वांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे, अशी खंत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केली. बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त बालगंधर्व परिवारातर्फे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला; तसेच ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी बालगंधर्व परिवाराचे मेघराज राजेभोसले, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, खासदार अनिल शिरोळे, महानगरपालिकेतील विरोधीपक्ष नेते चेतन तुपे, नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे, नीलिमा खाडे, सिद्धार्थ शहा, सुधीर मांडके, अंकुश काकडे, दीपक साळुंखे, कृष्णकुमार गोयल, प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते. संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. नितीन मोरे यांनी आभार मानले.शरद पवार म्हणाले, बालगंधर्व रंग मंदिर व्हावे, यासाठी प्रयत्न केलेले अनेक मानकरी आहेत. पुलंच्या दूरदष्टीने आणि विचाराने हे सुंदर सभागृह उभा राहिले. त्यांनी कलाकारांची सोय पाहिली. त्यामुळे गेली ५० वर्षे आपल्याला या वास्तुतून कलेचा आस्वाद घेता आला. बालगंधर्व रंगमंदिराच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकावरून वाद सुरू होता. त्या वेळी यशवंतराव चव्हाण तेव्हा नेमके पुण्यात होते. मी त्यांना ‘घाशीराम कोतवाल’च्या प्रयोगाला बालगंधर्वमध्ये घेऊन आलो. या नाटकाने महाराष्ट्रात पगडा निर्माण केला होता. ते केवळ राज्यापुरते उरले नव्हते. नंतर मला एकदा आमचे गुरू नरूभाऊ लिमये भेटले. ते म्हणाले की, तुला काही कळते का? तू यशवंतरावांना त्या नाटकाला का घेऊन गेलास? जुन्या पिढीतील लोकांना अनेक गोष्टी मान्य नसायच्या. जब्बारने मेहनतीने हे नाटक केले. भालबा केळकर यांनी पीडीए संस्थेच्या माध्यमातून अनेक उत्तम नाटके रंगभूमीला दिली, असेही ते म्हणाले.रोहिणी हट्टंगडी यांचा गौैरव करताना पवार म्हणाले, ‘रोहिणीतार्इंनी सशक्त अभिनयाची छाप उमटवली. अशा अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरल्या. रिचर्ड अ‍ॅटोनबोरो यांच्या ‘गांधी’ या चित्रपटात कस्तुरबाजींची व्यक्तिरेखा रोहिणीतार्इंनी कौशल्याने साकारली. आपल्या कलेशी समरस होऊन वर्षानुवर्षे दर्जा सांभाळून आणि रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवून सातत्याने यश मिळवणे अवघड काम आहे. ते रोहिणीतार्इंनी केले आहे. हट्टंगडी दाम्पत्याने कलेची सेवा केली आहे. दिल्लीत वेगळ्या घडामोडी सुरू असतानाही, मी रोहिणीतार्इंचा सत्कार करायचा आहे, असे सांगून आलो आहे.’