पुणे : कमला नेहरु हाॅस्पीटल जवळील शारदा स्वीट मार्टमधील सामाेशाच्या गाेड चटणीत उंदीर अाढळल्याची तक्रार एक ढाेल पथकातील लाेकांनी केली अाहे. या तक्रारीच्या अाधारे अन्न व प्रशासन विभागाने (एफडीए) काही पदार्थांचे नमुने तपासणीसाठी नेले हाेते. त्यातील काही पदार्थांमध्ये त्रृटी अाढळल्याने एफडीएने स्वीट मार्ट बंद ठेवण्याचे अादेश दिले अाहेत. त्रृटींमध्ये सुधारणा हाेत नाही ताेपर्यंत हे दुकान बंद ठेवण्यात येणार असल्याचेही या अादेशात म्हंटले अाहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी शारदा स्वीट मार्टमधून एका ढाेलपथकातील लाेकांनी सामाेसे खरेदी केले हाेते. सामाेशाच्या चटणीमध्ये मेलेला उंदीर अाढळल्याने त्यांनी त्याची तात्काळ तक्रार दुकानदाराकडे केली. दुकानदाराने त्यांना याेग्य प्रतिसाद न दिल्याने त्यांनी फरासखाना पाेलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या अाधारे पाेलिसांनी प्रशासनाशी संपर्क केला. अन्न सुरक्षा अधिकारी अार.बी. कुलकर्णी, अाणि पी.पी. गुंजाळ यांनी स्वीट मार्टला भेट देऊन उत्पादन अाणि विक्री केंद्र या ठिकाणांची तपासणी केली. त्याचबराेबर गाेड चटणी, मॅंगाे बर्फी व बेसन लाडू यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. 14 सप्टेंबरला तपासणी अहवालामध्ये अाढळलेल्या त्रृटींच्या अाधारे स्वीट मार्ट च्या उत्पादन विभागास सुधारणा नाेटीस पाठवण्यात अाली अाहे. त्याचबराेबर विक्री केंद्राच्या परवान्याचे नुतनीकरण करण्यात अाले नसल्याचेही समाेर अाले अाहे. त्यामुळे एफडीएकडून प्रतिबंधीत अादेश दिले अाहेत. परवान्याचे नुतनीकरण हाेईपर्यंत तसेच त्रुटींची पूर्तता करेपर्यंत स्वीट मार्ट बंद ठेवण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत.