का-हाटी : का-हाटी (ता. बारामती) परिसरात अद्यापही पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडलेल्या आहेत. शेतकºयांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.जिरायती भागात पाऊस झाला नसल्याने पाणी टंचाईसह खरिप हंगामातील पेरण्या शेतकºयांनी केल्याच नाहीत. ज्या शेतकºयांनी काही प्रमाणात प्रमाणात पेरण्या केल्या आहेत. त्याची उगवण झाली नाही. तर जी उगवल्या आहेत त्या जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. जिरायती भागातील सोनवडी सुपे, जळगाव सुपे, कारखेल, खराडेवाडी, उंडवडी सुपे, उंडवडी कडेपठार आदी परिसरात अद्यापही दमदार पाऊस नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईसह जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुबती जनावरे संभाळायची कशी असा प्रश्न शेतकºयांपुढे आहे. जनावरांना चारा नसल्याने दुग्ध व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे दुग्धोव्यावसाय अडचणीत आला आहे.याभागातील खरीप हंगामात बाजरी, मूग, उडीद, गुलछडी, चारा पिके आदी पिके घेत असतात. मात्र जुलै महिना सुरू झाला तरी देखील दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकºयांनी शेतात पेरणी पूर्व मशागत करुन ठेवली आहे. दररोज ढग येतात आणि सोसाट्याच्या वाºयाबरोबर ढग वाहून जातात, असे गेल्या पंधरा दिवसापासून सुरु आहे. त्यामुळे शेतकºयांचे लक्ष आभाळाकडे असल्याचे विजय वाबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जिरायती भागातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे, पिके जळून जाण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 1:29 AM