पिंपरी : आम्ही सर्व राजकीय पक्ष चाचपून पाहिले. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर संलगA राहून काम केले. पण त्यातूनच प्रतिस्पर्धी तयार झाले. म्हणूनच विरोधकांपेक्षा स्वकियांचीच भीती आम्हाला वाटते, अशी भावना आमदार विलास लांडे आणि लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केली.
निवडणूक लढायची की नाही, लढायची तर कोणत्या पक्षातून, हेच प्रश्न आमच्यापुढे आहेत. 25 वर्षे राजकारण आणि समाजकारणात आहोत. आमच्या निर्णयामुळे कायम आमच्याबरोबर काम करणा:या कार्यकत्र्याचीही ससेहोलपट होते. त्यामुळे कार्यकत्र्याची मते विचारात घेऊनच पुढील निर्णय घेणार आहे, असे उभय आमदारांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.
अनधिकृत बांधकामाचा प्रश्न केवळ पिंपरी-चिंचवडपुरता मर्यादित नाही. पूर्ण राज्यात हा प्रश्न आहे. आम्ही आमदार होण्यापूर्वी अनधिकृत बांधकामांना शास्ती आकारण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. रेडझोनचा प्रश्न युती शासनाच्या काळातला आहे.
माङया मतदारसंघात कार्यकत्र्याची मते विचारात घेऊन निवडणूक लढायची तर कशी, याचा निर्णय घेणार आहे. जगताप आणि मी आमदार असू एवढे निश्चित आहे, असे सांगून जगताप म्हणाले, आमचे काही चुकले असेल तर सुधारणा करण्याची तयारी आहे. कार्यकर्ते थांबा म्हणाले, तर थांबण्याचीसुद्धा तयारी ठेवली आहे.
आम्ही अपक्ष आमदार असूनही हे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला; परंतु केलेल्या कामाचे श्रेय आम्हाला दिले जात नाही. न झालेल्या कामांसाठी आम्हाला जबाबदार धरले जाते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.