सतिश सांगळेकळस : राज्यात कोरोनाचा संसर्ग फैलाव टाळण्यासाठी संचारबंदी घोषित झाल्याने लॉकडाऊनमध्ये रोपवाटिका धारकांचे मोठे नुकसान झाले आहे .कळस (ता.इंदापुर) येथील तयार रोपांना ग्राहकच नाही .वाहतूक व्यवस्थाही ठप्प असल्याने रोपवाटिकेतील सुमारे २५ लाख गुलाब, व शोभेची रोपे वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे .त्यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार आहे.
इंदापुर तालुक्यातील कळस या ठिकाणी गेली ३० वर्षांपासून रोपवाटिका व्यवसाय आहे. प्रामुख्याने या ठिकाणी गुलाब रोपांची निर्मिती केली जात होती .याठिकाणी दरवर्षी सुमारे २५ लाख रोपांची निर्मिती केली जाते .तसेच येथील रोपवाटीका धारकांनी विस्ताराने सर्व रोपे तयार करून आपल्या व्यवसायाला मोठे स्वरुप दिले .या ठिकाणी लहान मोठ्या सुमारे ५०रोपवाटिका आहेत .येथील तसेच यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या सुमारे ५०० आहे .तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शेकडो महिलांना यामुळे रोजगार उपलब्ध होत होता. त्यांचेही नुकसान झाले आहे.आपल्या व्यवसायात रोपवाटिका मालकांनी चांगली प्रगती साधली होती .मात्र,कोरोनाचा फैलाव झाल्याने संचारबंदी जाहीर करण्यात आली.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहतूक बंद झाली .त्यामुळे रोपवाटिकाधारकांचा विक्रीचा माल वाया जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथील रोपांना आंध्रप्रदेश मधील राजमंड्री,गुजरात मधील अहमदाबाद, कर्नाटक मधील विजापूर व राज्यातील पुणे,लातूर, नांदेड, उस्मानाबाद या ठिकाणी मोठी मागणी असते. विक्रीचा काळ लोटलाअसल्याने गुलाबाची कळीधारण केलेली रोपे फेकून द्यावी लागणार आहेत.यामुळे लाखोंचा खर्च पाण्यात गेला आहे. तसेच नियमित विक्रीची लिंब,चिंच,अशोक, गुलमोहर, करंज, अर्जुन, जांभूळ, बेहडा, हिरडा, बदाम,निलगिरी, बांबू, रेन ट्री,पारिजातक, फायकस, या शोभेच्या नाशवंत मालाचीप्रत खराब होऊन नुकसान सोसावे लागणार आहे. उन्हाळी हंगामात शोभेच्यारोपांना चांगली मागणी असते .पणलॉकडाऊनमुळे वाहतूक बंद असल्याने माल पडूनराहिला आहे.———————————————...लाखोंच्या पटीत रोपवाटिका धारकांचे नुकसान
उत्पादित मालाला प्रतिरोपाला संगोपन करताना मोठा खर्च येत आहे.रोपवाटिका धारकांनी हजारोंच्या पटीत माल तयार केला आहे. त्यामुळे लाखोंच्या पटीत रोपवाटिका धारकांचे नुकसान होत आहे विलास पानसरे, कळस (रोपवाटीका धारक)—————————————————