पुणे : गतवर्षी वटपोर्णिमेच्या दिवशी मंगळसुत्र चोरट्यांनी शहरात चार तासात धुमाकुळ घालून दहशत निर्माण केली होती़. त्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलाने उद्या रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून नाकाबंदीला सुरुवात करण्यात येणार असून महिलांना वटपोर्णिमा निर्भयपणे साजरी करता यावी, यासाठी शहरातील बंदोबस्तात वाढ केली आहे़. गेल्या वर्षी वटपोर्णिमेच्या दिवशी एका मोटारसायकलवरील दोघा चोरट्यांनी कॅम्पपासून शिवाजीनगर, थेट सांगवी, बाणेर, मार्केटयार्ड अशा शहराच्या महत्वाच्या सर्व भागात फिरुन तब्बल १२ महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेले होते़. सुमारे साडेपाच लाख रुपयांचा ऐवज हिसकावून नेताना त्यांनी शहरात चार तास धुमाकुळ घालत एकच खळबळ उडवून दिली होती़. काही दिवसांनी या दोघा चोरट्यांना पकडण्यात खडक पोलिसांना यश मिळाले होते़. या पार्श्वभूमी वटपोर्णिमा शहरात पोलिसांनी रविवारी मोठा बंदोबस्त लावला आहे़. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी शनिवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या सर्व युनिटची बैठक घेऊन उद्याच्या बंदोबस्ताची माहिती सर्वांना देऊन आवश्यक ती काळजी घेण्याचे आदेश दिले आहे़. त्यानुसार शनिवारी रात्री संपूर्ण शहरात काँबिंग आॅपरेशन राबविण्यात येणार आहे़. शहरात मंगळसुत्र चोरणारे जवळपास ४० ते ४५ रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत़. त्याची रात्री चेकिंग करण्यात येणार असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे़. बाहेरील शहरातून येऊन मंगळसुत्र चोरी करणाºया अनेक टोळ्या आहेत़ त्या सध्या कोठे आहेत, त्याची तपासणी केल्या आठवड्यापासून सुरु करण्यात आली असून संबंधित पोलीस ठाण्यांना त्याची माहिती देण्यात आली आहे़. याशिवाय शहरातील सर्व लॉज, हॉटेलची तपासणी करण्यात येणार आहे़. शहरातील मंदिरे तसेच जेथे वटपोर्णिमा साजरी करण्यासाठी महिला एकत्र येतात, अशा ठिकाणी व परिसरात बंदोबस्त ठेवण्याचे आदेश प्रत्येक पोलीस ठाण्याला देण्यात आले आहेत़. याशिवाय १२ हॉर्ट स्पॉट निवडण्यात आले असून तेथे बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे़. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या हद्दीत बंदोबस्त वाढविण्यास सांगण्यात आले आहे़. ...............याबाबत पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले की, वटपोर्णिमेला सकाळी ६ वाजल्यापासून शहरात नाकाबंदी करण्यात येणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करुन त्यांच्यावर प्रतिबंधकात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जेथे वटाची पुजा होते, त्या परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्याचे आदेश त्या त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत. उद्या मोठ्या प्रमाणावर संपूर्ण शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे.वटपोर्णिमेच्या सणानिमित्त पोलिसांनी सर्व आवश्यक ती काळजी घेतली असून नागरिकांनी निर्भयपणे सण साजरा करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ़ के़ व्यंकटेशम यांनी केले आहे़.
निर्भयपणे सण साजरी करा वटपोर्णिमा : दिवसभर असणार कडक '' पोलीस वॉच''
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 8:52 PM
गतवर्षी वटपोर्णिमेच्या दिवशी मंगळसुत्र चोरट्यांनी शहरात चार तासात धुमाकुळ घालून दहशत निर्माण केली होती़.
ठळक मुद्देसकाळी सहापासून पोलिसांची नाकाबंदी, रात्रभर गुन्हेगारांचे चेकिंग