लोणी भापकर : बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील संजय माणिकराव भापकर यांना पोलीस दलातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती शौर्यपदकाने राज्यपालांच्या हस्ते नुकतेच गौरविण्यात आले. त्यानिमित्ताने लोणी भापकर ग्रामस्थांच्या वतीने भापकर यांचा रविवारी नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी भापकर यांनी दर वर्षी गावातील ५ गरजू व गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च करणार असल्याचे जाहीर केले. जिरायती भागातील लोणीभापकर सारख्या गावातील भापकर यांनी मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून नोकरीस सुरुवात केली. सध्या सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. रवी पुजारी सह अनेक गुंडांच्या टोळीस जेरबंद करण्यात महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या भापकर यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने १५ आॅगस्ट रोजी राज्यपाल विद्यासागर राव यांनी गौरविले. त्यानिमित्ताने लोणीभापकरसह परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने आज नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी भापकर यांनी दर वर्षी गावातील ५ गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेणार असल्याचे जाहीर केले. या वेळी ‘सोमेश्वर’चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, बाबासाहेब भापकर, रवींद्र भापकर, हनुमंत भापकर, सुरेश भापकर, दिलीप जगदाळे, अॅड. विक्रमसिंह दांगडे पाटील, एस. एल. भापकर, मुनीर तांबोळी, विलास भापकर यांनी मनोगत व्यक्त केले. संजय भापकर, जयदीप भापकर यांनी सूत्रसंचालन, तर त्रिंबकराव भापकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)
राष्ट्रपती शौर्यपदक विजेत्याचा सत्कार
By admin | Published: August 31, 2015 3:47 AM