जुन्नर : बेल्हा (ता.जुन्नर)येथील कोंबरवाडी शिवारातील यादवमळ्यात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास अडीच वर्ष वयाची मादी बिबट्या जेरबंद झाला आहे. या बिबट्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात पाठवण्यात आले आहे.या परिसरात या बिबट्याने मोठ्या प्रमाणात पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत. एक बिबट्या पकडण्यात आला तरी या भागात काही बिबटे असल्याने नागरिकांची भीती मात्र कायम आहे.पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.या भागात कालच बिबट्याने केलेल्या हल्यात तीन शेळ्या ठार केल्या होत्या.वसंत अनंथा साळुंखे व दगडु अनंथा साळुंखे यांच्या गट नं ३३ या ठिकाणी वनखात्याने पिंजरा लावला होता. याठिकाणी वनपरिमंडल क्षेत्र अधिकारी डी.डी.फापाळे,वनकर्मचारी जे.टी.भंडलकर यांनी संबंधित बिबट्याला माणिकडोह येथे हलविण्यात सांगण्यात आले.
जुन्नर येथे बिबट्या मादी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 5:23 PM
या भागात सोमवारीच बिबट्याने केलेल्या हल्यात तीन शेळ्या ठार केल्या होत्या.
ठळक मुद्देएक बिबट्या पकडण्यात आला तरी या भागात काही बिबटे असल्याने नागरिकांची भीती मात्र कायम