पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी खासदार वंदना चव्हाण यांच्याकडे महाविद्यालयातील समस्यांची तक्रार केली. राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या पुणे शाखेने कॉफी विथ स्टुंडट या उपक्रमांतर्गत त्यांची विद्यार्थ्यांशी भेट घडवून आणली. त्यानंतर त्यांनी लगेचच प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांच्याबरोबर चर्चा केली व विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवाव्यात, अशी विनंती त्यांना केली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, शहराध्यक्ष ऋषी परदेशी, तसेच संकेत ढवळे, मनाली भिलारे, संध्या सोनावणे, केशव माने, रवी आमरावती, राज पाटील, साई होळकर, सौरभ माने, वैभव थरकुडे आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी प्रमुख्याने स्वच्छतागृहाची दुरवस्था, वसतिगृहामध्ये पाण्याची समस्या, महाविद्यालयाच्या सुरक्षा भिंती, परत तपासणीचे पेपर दाखविणे याबाबत खासदार चव्हाण यांना माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयीन उपक्रम, त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग, सामाजिक बांधिलकी, राजकीय विचारसरणी आदींबाबत माहिती घेतली.
विद्यार्थ्यांनी मांडल्या खासदारांसमोर समस्या; राष्ट्रवादीचा पुण्यात कॉफी विथ स्टुडंट उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:52 AM
फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी खासदार वंदना चव्हाण यांच्याकडे महाविद्यालयातील समस्यांची तक्रार केली. राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या पुणे शाखेने कॉफी विथ स्टुंडट या उपक्रमांतर्गत त्यांची विद्यार्थ्यांशी भेट घडवून आणली.
ठळक मुद्देविद्यार्थी-विद्यार्थिनींनी खासदार वंदना चव्हाण यांच्याकडे समस्यांची केली तक्रारराष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेने कॉफी विथ स्टुंडट या उपक्रमांतर्गत घडवून आणली भेट