शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

बारामती तालुक्यात शेतकऱ्यांना थेट बांधावर होतोय खत पुरवठा, ४४ लाख ६३ हजारांची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 12:47 PM

संचारबंदी काळामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते यांचा पुरवठा वेळेत होणे गरजेचे होते.

ठळक मुद्देकृषि विभाग, शेतकरी गट,विक्रेते यांच्या समन्वयातून उपक्रमखरीपाच्या पेरण्या सुरू होण्यापूर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना आवश्यक खतांचा पुरवठा होणार या योजनेचा तालुक्यातील १ हजार ३८९ शेतकऱ्यांना २४३ शेतकरी गटांच्या माध्यमातून फायदा

रविकिरण सासवडे- बारामती : संचारबंदी काळात कृषि विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना थेट बांधावर खत पोहच करण्यात येत आहे. बारामती तालुक्यात आतापर्यंत ४४ लाख ६३ हजार ८५२ किंमतीची खते शेतकऱ्यांना बांधावर देण्यात आले आहे. या योजनेचा तालुक्यातील १ हजार ३८९ शेतकऱ्यांना २४३ शेतकरी गटांच्या माध्यमातून फायदा मिळाला आहे.संचारबंदी काळामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते यांचा पुरवठा वेळेत होणे गरजेचे होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने शेतरकऱ्यांनी कृषि सेवा केंद्रावर जाऊन निविष्ठा खरेदी करताना संचारबंदी नियमावलीचे पालन न केल्यास कोरोना साथीचा फैलाव होण्याचा धोका होता. हा धोका टाळण्यासाठी कृषि विभागाच्या आदेशाने शेतकऱ्यांना आवश्यक खते थेट बांधावर पोहच करण्याबाबतचा २७ एप्रिल २०२० रोजी घेण्यात आला होता. त्या निर्णयाप्रमाणे बारामती तालुक्यातील बारामती, सुपे, उंडवडी सुपे,वडगाव निंबाळकर या चार मंडळामध्ये आत्मा अंतर्गत असणारे सर्व शेतकरी गट व ज्या शेतकऱ्यांना या योजनेतर्गंत बांधावर खत हवे होते अशा शेतकऱ्यांचे गटतयार करण्यात आले. या एका गटामध्ये सुमारे २० शेतकरी घेण्यात आले.आपल्याला आवश्यक असणारी खते व बियाणे यांची मागणी सबंधीत गटप्रमुखाकडे शेतकऱ्यांनी नोंदवल्यानंतर तो गटप्रमुख कृषि सेवा केंद्रामधून खतांची खरेदी करीत असल्याने कृषि सेवा केंद्रामध्ये होणारी गर्दी देखील यामुळे कमी झाली. यावर थेट कृषि विभागाचे नियंत्रण असल्याने जास्त दराने होणारी खत विक्री थांबली गेली. तसेच शेतकऱ्यांना देखील गुणवत्तापूर्ण व विश्वासार्ह खते मिळणे सुलभ झाले.

आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर निविष्ठा खरेदीमध्ये पारदर्शकता यावी यासाठी संबंधित गावातील विक्रेता, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक वकृषि अधिकारी यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याच्या सुचना कृषि विभागाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. तसेच ३१ मे २०२० पूर्वी खरीपाच्या पेरण्या सुरू होण्यापूर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना आवश्यक खतांचा पुरवठा होणार आहे.

तालुक्यामध्ये बांधावर शेतकऱ्यांना खते पोहच करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषि विभाग देखील यावर लक्ष ठेवून आहे. एखाद्या शेतकऱ्यांची फसवूक झाल्यास त्याने तक्रार करावी. त्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.- दत्तात्रय पडवळ, तालुका कृषि अधिकारी, बारामती

...........

मंडळ           शेतकरी      खते               रक्कम                    गट          (टनामध्ये)बारामती       ६१             ८४.३            ९,८१,३६५सुपे              ७२             ५७            ८,०५,९३६उंडवडी         ४०                ९१         १२,१७,६७३सुपे              -                   -              -वडगाव        ७०             ८०             १४,५८,८७८निंबाळकर

एकूण          २४३          ३१२.३          ४४,६३,८५२

टॅग्स :BaramatiबारामतीFarmerशेतकरीagricultureशेतीcorona virusकोरोना वायरस बातम्या