शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

पाहुनी समाधीचा सोहळा। दाटला इंद्रायणीचा गळा।।

By admin | Published: November 21, 2014 4:09 AM

राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवत ‘श्रीं’चे दर्शन घेतले.

आळंदी : पाहुनी समाधीचा सोहळा। दाटला इंद्रायणीचा गळा।।बाळ सिद्ध पाहता चिमुकला। कुणी गहिवरे कुणी हळहळे।।भाळी लावून चरण रजाला चरणावरी लोळला। चोखा गोरा आणि सावता।।निवृत्ती हा उभा एकटा। सोपानासह उभी मुक्ता अश्रुपूर लोटला।। ‘ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम...’ असा संजीवन सोहळ्याच्या कीर्तनातील जयघोष... दुपारचे बारा वाजले आणि घंटानाद... समाधीवर पुष्पवृष्टी... संत नामदेव महाराज व माऊलींची भेट... आणि असंख्य भाविकांचे पाणावलेले डोळे... अशा भावपूर्ण वातावरणात श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांचा ७१८वा संजीवन समाधी सोहळा गुरुवारी (दि.२०) ‘माऊली-माऊली’च्या जयघोषात पार पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवत ‘श्रीं’चे दर्शन घेतले.तत्पूर्वी, माऊलींना पवमान अभिषेक व दुधआरती घालून पहाटे तीनच्या सुमारास प्रमुख विश्वस्त डॉ. प्रशांत सुरु यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी अकरापर्यंत भाविकांच्या महापूजा, दर्शन व नामदेवराय यांच्या वतीने श्रींची महापूजा घेण्यात आली. सकाळी वीणा मंडपात देवस्थानच्या वतीने कीर्तन झाल्यानंतर मुख्य संजीवन सोहळ्याला सुरुवात झाली. दहा वाजता संत नामदेव महाराजांचे वंशज हभप ज्ञानेश्वरमहाराज नामदास यांचे कीर्तन सुरू झाले. मंदिराच्या महाद्वारात काल्याचे कीर्तन व हैबतबाबा दिंडीचे आगमन झाले. टाळ मृदंगाच्या निनादात हैबतबाबांच्या दिंडीने समाधी मंदिरास प्रदक्षिणा पूर्ण करून ज्ञानदेवांचा जयघोष केला. दुपारी बाराच्या सुमारास संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. घंटानाद, अभिषेक व माऊलींच्या समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी करून आरती करण्यात आली. संत नामदेव महाराजांच्या पादुका त्यांच्या वंशजांच्यामार्फत वीणा मंडपातून करंज्या मंडप, पंखा मंडप व मुख्य गाभाऱ्यात माऊलींच्या समाधीच्या पुढे विराजमान करण्यात आल्या. त्यानंतर माऊलींना महानैवद्य देऊन देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. प्रशांत सुरु, विश्वस्त शिवाजीराव मोहिते, विश्वस्त श्यामसुंदर मुळे यांच्या हस्ते चोपदार व प्रमुख मान्यवरांना नारळ प्रसाद देण्यात आला. संत श्री नामदेवमहाराजांच्या वंशजांनी त्यांच्या पादुकांची मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून जयजयकार केला.(वार्ताहर)