विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 06:58 PM2024-10-21T18:58:17+5:302024-10-21T19:00:06+5:30
वंचित आघाडीकडून आज आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली असून वंचितने आज १६ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली.
Prakash Ambedkar Candidate ( Marathi News ) :प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने यंदा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्याचा सपाटा लावला आहे. वंचित आघाडीकडून आज आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली असून वंचितने आज १६ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये हाय व्होल्टेज समजल्या जाणाऱ्या बारामती विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. वंचितने बारामतीतून मंगलदास निकाळजे यांना उमेदवारी दिली आहे.
बारामती मतदारसंघात यंदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्याकडून तर प्रचारासही सुरुवात झाली असून त्यांची प्रचारवाहने मतदारसंघात फिरण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे, युगेंद्र पवार यांच्याकडून थेट जनसंपर्कावर भर दिला जात आहे. असं असताना आता प्रकाश आंबेडकर यांनीही बारामती मतदारसंघातून उमेदवार जाहीर केल्याने ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.
वंचितकडून पाचव्या यादीत कोणाकोणाला संधी?
१. भुसावळ - जगन देवराम सोनवणे
२. मेहकर - डॉ. ऋतुजा चव्हाण
३. मूर्तिजापूर - सुगत वाघमारे
४. रिसोड - प्रशांत सुधीर गोळे
५. ओवळा माजिवडा- लोभर्सिग गणपतराव राठोड
६. ऐरोली - विक्रांत दयानंद चिकणे
७. जोगेश्वरी पूर्व - परमेश्वर रणशुर
८. दिंडोशी - राजेंद्र तानाजी ससाणे
९. मालाड - अजय आत्माराम रोकडे
१०. अंधेरी पूर्व - अॅड. संजीवकुमार कलकोरी
११. घाटकोपर पश्चिम - सागर रमेश गवई
१२. घाटकोपर पूर्व - सुनिता मायकवाड
१३. चेंबूर - आनंद भीमराव जाधव
१४. बारामती- मंगलदास तुकाराम निकाळजे
१५. श्रीगोंदा - अण्णासाहेब शेलार
१६. उदगीर - प्रा. डॉ. शिवाजीराव मरेप्पा देवनाळे