प्रकरणी सनील भाऊ केदारी (रा. कोलवाडी, ता. मावळ जि. पुणे ) याला अटक करण्यात आली आहे. यावेळी गाडी चालक व मालक संजय मोहिते (रा. गोवित्री, ता. मावळ) हा पळून गेला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट रोजी उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार राजेंद्र थोरात, प्रकाश वाघमारे, मुकुंद कदम, दत्तात्रय जगताप, हवालदार सचिन घाडगे, मुकुंद आयचीत, प्रमोद नवले, प्राण येवले हे पोलीस पथक पुणे ते मुंबई रस्त्यावर पेट्रोलिंग करीत होते. कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवित्री गावाच्या जवळ हे पोलीस पथक होते. गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने कामशेत पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलीस निरीक्षक आकाश पवार, हवालदार अजय दरेकर यांच्या मदतीने एक चारचाकी पाठलाग करून पकडली. गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये एकूण २५ किलो गांजा सापडला. यावेळी गाडीतील दोघां पैकी गाडी चालक व मालक संजय मोहिते हा पळून गेला. तर सनील भाऊ केदारी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या कडून पावणेचार लाख रुपयांचा गांजा व दहा लाख रुपयांची गाडी असा एकूण पावणेचौदा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी हा सराईत असून यापूर्वी त्याचेवर २ गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास हा कामशेत पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप हे करीत आहेत.
--
फोटो २० लोणीकाळभोर गांजा पकडला