पोलीस नाईक संजय नारायण माडेकर यांनी तक्रार दाखल केली आहे.
याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: पेठ (ता. आंबेगाव) येथे ५ जून रोजी सकाळी अकराच्या सुमारास मिथुन शांताराम धुमाळ, शांताराम बबन धुमाळ, रवींद्र बबन धुमाळ, बाबाजी बबन धुमाळ, राजेंद्र ज्ञानेश्वर धुमाळ (सर्व रा. पेठ) यांनी मिथुन शांताराम धुमाळ याच्या लग्नानिमित्त मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित केला. ५० ते ६० लोकांना एकत्र जमवून वाजंत्री मार्फत वाद्यकाम व गाड्यांची रॅली काढत फटाके फोडून पेठ गावातील बाजारपेठेतून लग्नाची मिरवणूक नाचवत गावातील चौकापर्यंत घेऊन गेले. शासनाचा दिलेल्या आदेशाचा अवमान झाल्याप्रकरणी तसेच कोरोना संसर्ग रोग पसरण्यास मदत होईल असे वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेंद्र हिले करत आहेत.